scorecardresearch

Premium

कराटे बेल्टने गळा आवळून आईची हत्या, नंतर मामाला पाठवला मेसेज; नवी मुंबईतील घटनेने पोलीसही चक्रावले

नवी मुंबईत १५ वर्षीय मुलीने कराटे बेल्टने गळा आवळून आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

Navi Mumbai, Airoli, Rabale, Teen kills mother
नवी मुंबईत १५ वर्षीय मुलीने कराटे बेल्टने गळा आवळून आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना (प्रातिनिधिक फोटो)

नवी मुंबईत १५ वर्षीय मुलीने कराटे बेल्टने गळा आवळून आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ३० जुलै रोजी ऐरोलीत ही घटना घडली. आईने अभ्यासाचा तगादा लावल्याने मुलीने आईची हत्या केल्याचं समोर आलं आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पीडित ४१ वर्षीय महिला वारंवार मुलीच्या मागे लागली होती. यामुळे दोघींमध्ये जोराचं भांडण झालं होतं

ही घटना ३० जुलै रोजी घडली असली तरी गेल्या आठवड्यात मुलीने हत्येची कबुली दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. रबाळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी मुलीने आईविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधला होता. यानंतर पोलिसांनी तिच्या पालकांना समुदेशनासाठी बोलावलं होतं.

Aslam shaikh death threat call
“मी गोल्डी ब्रार बोलतोय, पुढच्या दोन दिवसांत…”, मुंबईतील काँग्रेस आमदाराला जीवे मारण्याची धमकी
wife killed her husband by beating with wooden rolling
ट्युशनला जाते सांगून मुलुंड स्टेशनला आली, फलाटावर ट्रेन येताच शांतपणे रुळांवर उतरली अन्…, धक्कादायक घटना समोर
son-in-law killed wife, brother-in-law grandmother-in-law Savlivihir shirdi
तिहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली; दोघांना अटक
man arrested for killing wife in lohegaon over over suspicion of her character
नायगावमध्ये तरुणीची हत्या

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुलीने नीट परीक्षेसाठी तयारी करावी यासाठी महिला तिच्या मागे लागली होती. मुलीने डॉक्टर व्हावं अशी त्यांची इच्छा होती.

३० जुलैला परीक्षेच्या तयावरीवरुन दोघींमध्ये पुन्हा एकदा भांडण झालं. मुलीने आईला धक्का दिल्या, ज्यानंतर त्यांच्या डोक्याला जखम झाली. यानंतर मुलीने कराटे बेल्टने गळा आवळून आईची हत्या केली. “मुलीने आईचा मृतदेह बेडवर ठेवला आणि आत्महत्या दर्शवण्यासाठी आईच्या मोबाइलवरुन मामाला मेसेज पाठवला. मी सर्व प्रयत्न केले, पण आता माघार घेत असं तिने मेसेजमध्ये लिहिलं होतं,” अशी माहिती रबाळे पोलिसांनी दिली आहे.

शवविच्छेदन केलं असता गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचं उघड झालं. “महिला पोलीस कर्मचाऱ्याने मुलीला विश्वासात घेतलं असता तिने हत्येची कबुली दिली,” असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Navi mumbai teen kills mother strangulating with a karate belt for asking her to study sgy

First published on: 10-08-2021 at 08:47 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×