गडचिरोली: भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राअंतर्गत छत्तीसगड सीमेलगत असलेल्या अबुजमाड भागातील कोपर्शी व फुलनार जंगल परिसरात नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात सलग तीन चकमकी उडाल्या असून पोलिसांनी नक्षलवाद्यांना पळवून लावत नक्षलवाद्यांचे मोठे शिबिर उध्वस्त केले आहे. यावेळी घटनास्थळावरून आईडी बॉम्ब तथा मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राअंतर्गत कोपर्शी व फुलनार जंगल परिसरात नक्षलवाद्यांचा मोठा कॅम्प असल्याच्या गोपनीय माहितीवरून नक्षलविरोधी अभियान पथक सी-६० चे जवान अभियान राबविण्यास गेले असतांना रविवारी दुपारी साधरणत: साडेचार च्या सुमारास भामरागड दलमच्या नक्षलवाद्यांनी अचानक अभियान पथकाच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यांनतर नक्षलवाद्यांनी पळ काढला. जवानांनी पाठलाग केला तेव्हा त्यांनी पुन्हा गोळीबार केला व पळून गेले असाच प्रकार तिसऱ्यांदा घडला. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxals clash with police in gadchiroli naxal places destroyed srk
First published on: 27-09-2021 at 20:16 IST