भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार ही अफवा

सचिन अहिर यांच्याविषयी मला माहिती नाही. पण मी शिवसेनेत जाणार नाही

विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना महाराष्ट्रात मोठा राजकीय हालचाली वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा होती. मात्र, ही फक्त अफवा असल्याचे समोर आले आहे. शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याचे वृत्त छगन भुजबळ यांनी फेटाळले आहे. शिवबंधन हाती बांधण्याचे वृत्त निव्वळ अफवा असल्याची प्रतिक्रिया भुजबळ यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

सचिन अहिर यांच्याविषयी मला माहिती नाही. पण मी शिवसेनेत जाणार नाही, असे स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिले आहे. बुधवारी रात्री छगन भुजबळ आणि सचिन अहिर राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. चिरंजीव पंकज भुजबळ यांच्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. स्वतः छगन भुजबळ राजकीय संन्यास घेण्याच्या मनस्थितीत असल्याचं मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भुजबळ यांनी यावर मौन सोडत या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे सचिन अहिर घड्याळ सोडून हातावर बांधणार शिवबंधन 

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीच्या तोंडावर धक्का बसला आहे. कारण राष्ट्रवादीचे सचिन अहिर हे आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सचिन अहिर यांनी स्वतःच प्रसारमाध्यमांना दिली आहे. अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागतात. मला शिवसेनेत जात असल्याचा आनंद होतो आहे. सकाळी ११ वाजता मातोश्री या ठिकाणी ते उपस्थित राहणार आहेत असेही त्यांनी सांगितले आहे. सचिन अहिर यांच्या या निर्णयामुळे मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार पडलं आहे.

मी गेल्या आठवड्यात शरद पवार यांना फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांचे जे स्थान आहे ते माझ्या हृदयात कायम राहणार आहे. मात्र अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागतात असे अहिर यांनी म्हटले आहे. तसेच आदित्य ठाकरे यांच्या कामामुळे प्रभावित झालो आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp chhagan bhujbal denied news join to shivsena nck

Next Story
राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी