मी आज क्रिकेटच्या मैदानावर उतरलो आहे, मैदान कोणतेही असो, मग ते क्रिकेटचे असो की राजकीय मैदान परळीची जनता, परळीचे प्रेक्षक नेहमीच माझ्या पाठीशी असल्यामुळे कोणतेही मैदान मीच जिंकणार, परिवर्तन घडवणारच अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज परळीच्या क्रिकेटच्या मैदानावर जोरदार राजकीय फटकेबाजी केली. उद्घाटनाच्या क्रिकेट सामन्यात स्वतः मैदानात बॅट आणि बॉल घेऊन उतरत आपल्यातील क्रिकेटपटूचे त्यांनी प्रदर्शन केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने परळीत डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी बोलत होते.

viral ukhana video
VIDEO : “…पण क्रिकेट कधीच नाही सोडणार..” तरुणाने उखाण्यातून पत्नीला स्पष्टच सांगितले, व्हिडीओ होतोय व्हायरल
rishbh pant
Ipl 2024, LSG vs DC: दिल्लीला कामगिरीत सुधारणेची आशा! आज लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान; राहुल, पंतकडे लक्ष
sourav ganguly
पंत तंदुरुस्त, पण सिद्ध करण्यासाठी वेळ हवा – गांगुली
Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Updates
KKR vs RR : कोलकातामध्ये आरआर आणि केकेआर यांच्यातील सामन्यात होऊ शकतो बदल, जाणून घ्या काय आहे कारण?

कुणाची विकेट घेण्यासाठी कधी आणि कसा बॉल टाकायचा हे आम्हाला चांगलेच माहित आहे. यावेळी पहिल्याच बॉलवर विकेट काढण्याचा आपला निर्धार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून मैदानावर उतरली आहे, महाराष्ट्र आणि देशात चषक राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीलाच मिळणार, परिवर्तन घडवणारच असा विश्‍वासही त्यांनी बोलून दाखवला.

सुरेश रैनाचा संदेश
या स्पर्धेच्या उद्घाटनाला भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू सुरेश रैना येणार होता, मात्र विमान चुकल्यामुळे तो येऊ शकला नाही, मात्र मोबाईलद्वारे त्याने स्पर्धेला आणि सर्व खेळाडूंना आपल्या शुभेच्छा दिल्या.

बक्षिस वितरणाला सुरेश रैना आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हे येतील अशी घोषणा करताच उपस्थित प्रेक्षकांनी त्याला जोरदार प्रतिसाद दिला. या उद्घाटन कार्यक्रमाला अलोट गर्दी उसळली होती.

आगामी एक महिना या स्पर्धा चालणार असून, त्यात शहर व ग्रामीण भागातील एकूण १८८ संघांनी भाग घेतला आहे. या स्पर्धेचे युट्युब चॅनेलद्वारे थेट प्रेक्षपण केले जात आहे.