माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झाला आहे. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात सुरू असलेला ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी शुक्रवारी जितेंद्र आव्हाडांना अटक केली होती. आज शनिवारी न्यायालयाने आव्हाडांना जामीन मंजूर केला आहे.

जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर होताच पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. “तुमचं आमचं नातं काय?… जय शिवाजी… जय शिवाजी…” अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या आहे. जामीन मिळाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“काही लोकांना जमिनीवर आणायचं असेल तर जामिनाची पर्वा करायची नसते. ‘चाणक्य’ नीति फसली. अटकेनंतर जामीन आणि जेवण दोन्ही मिळालं” अशी प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली आहे. त्यांचं ट्वीट सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे.