Vidya Chavan Criticized CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांच्या दालनात एक छोटेखानी पुजेचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. जादू टोना करून मिळवलेली मुख्यमंत्र्यांनी खुर्ची जास्त काळ टिकणार नाही, असा खोचक टोला त्यांनी शिंदे यांना लगावला आहे.

नेमकं काय म्हणाल्या विद्या चव्हाण –

२१ ते २७ जूनच्या अमावस्येपर्यंत कामाख्या देवीच्या मंदिरात हवन करून, तिथले अघोरी पुजेचे धागेदोरे आणून मंत्रालयात बसवून मुख्यमंत्री आज पदभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्री पदाची खुर्ची जाऊ नये म्हणून ही पुजा करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया विद्या चव्हाण यांनी दिली आहे.

त्या पुढे म्हणाल्या, ”हा महाराष्ट्र आई तुळजा भवानीचा आहे. साडेतीन शक्तीपिठांचे आशीर्वाद या महाराष्ट्राला लाभले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची केलेली प्रतारणा राज्यातील पुरोगामी जनता कधीही सहन करणार नाही. त्यामुळे शिवबांच्या महाराष्ट्रात चातुर्याने किंवा जादूटोणा करून मुख्यमंत्रीपद मिळवलं असलं तरी, ते जास्त काळ टिकणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – शिवसेना म्हणजे भरकटलेलं जहाज, बेताल वक्तव्ये करणारे प्रवक्तेच शिल्लक राहणार- राधाकृष्ण विखे पाटील