विधानसभेत अर्वाच्य भाषा वापरल्याने निलंबित करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांचे करण्यात आलेले निलंबन एक दिवसात रद्द झाले आहे, तर काँग्रेसचे पाच आमदार मात्र अजूनही निलंबितच आहेत.
कायदा व सुव्यवस्था विषयावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत उभे राहिले असताना त्यात विरोधक अडथळा निर्माण करीत होते. त्यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्याशी विरोधकांची व आव्हाड यांची बाचाबाची झाली. त्यात आव्हाड यांनी अर्वाच्य शब्द उच्चारल्याने त्यांना हिवाळी अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आले होते. पण त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. निलंबन मागे घेईपर्यंत कामकाजावर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे सत्तारूढ पक्षाच्या नेत्यांनी विचारविनिमय करून आव्हाड यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.