नगर : जिल्ह्यात आज, गुरुवारी ४५८ नव्याने करोनाबाधित आढळले, त्यातील नगर शहरातील संख्या २४ आहे. आज ४८५ रुग्ण करोनामुक्त झाले. उपचार सुरू असलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ६ हजार ९ झाली आहे.
बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७७ हजार ९०४ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८८ टक्के झाले आहे. रुग्णसंख्येत ४५८ ने वाढ झाल्याने उपचारार्थी रुग्णांची संख्या २ हजार ९४६ झाली आहे.
आज आढळलेले बाधित पुढीलप्रमाणे – पारनेर ५५, शेवगाव ५४, पाथर्डी ५२, राहाता ४४, नगर तालुका ४२, संगमनेर ४२, नगर शहर २४, नेवासा २४, श्रीगोंदे २२, श्रीरामपूर १०, अकोले १५, कर्जत १५, जामखेड १३, कोपरगाव १३, इतर जिल्ह्यातील ११, राहुरी १० व भिंगार ३. भिंगारमध्ये गेली काही दिवस एकही रुग्ण आढळला नव्हता, परंतु आज गुन्हा रुग्ण आढळले.
आज करोनामुक्त झालेले पुढीलप्रमाणे – मनपा २४, अकोले १२, जामखेड ४४, कर्जत २०, कोपरगाव १८, नगर तालुका २५, नेवासा १७, पारनेर ७६, पाथर्डी ४९, राहता १५, राहुरी २२, संगमनेर ६७, शेवगाव ३३, श्रीगोंदा ४३, श्रीरामपूर १६, भिंगार १, इतर जिल्हा ३.
जिल्ह्याची आकडेवारी
बरे झालेले रुग्ण : २ लाख ७७ हजार ९०४
उपचार सुरू असलेले रुग्ण : २ हजार ९४६
पोर्टलवरील मृत्यू नोंद : ६ हजार ९
एकूण रुग्ण : २ लाख ८६ हजार ८५९