scorecardresearch

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याची शिंदेंची तयारी? स्मिता ठाकरेंनंतर ठाकरे कुटुंबातील ‘या’ सदस्याने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

उद्धव ठाकरे यांच्या वहिनी स्मिता ठाकरे यांनी काही दिसवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

Nihar thackeray meet with cm eknath Shinde after smita thackeray
निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना शिंदे गट आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. उद्धव ठाकरे यांच्या वहिनी स्मिता ठाकरे यांनी काही दिसवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा ठाकरे कुटुंबातील एका सदस्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे यांचे पुतणे आणि हर्षवर्धन पाटील यांचे जावई निहार ठाकरे यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

कोण आहे निहार ठाकरे?

निहार ठाकरे हे बिंदू माधव ठाकरे यांचे चिरंजीव आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचे पुतणे आणि हर्षवर्धन पाटील यांचे जावई आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ते आपली राजकीय कारकीर्द सुरु करणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा – “रझा अकादमी, पीएफआय या संघटनांवर बंदी घालावी”; खासदार अनिल बोंडेंची मागणी

स्मिता ठाकरेंनी घेतली होती शिंदेंची भेट

काही दिवसांपूर्वीच सह्याद्री अतिथीगृहावर जयदेव ठाकरे यांच्या पत्नी आणि उद्धव ठाकरे यांच्या वहिनी स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर स्मिता ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना, आपण मुख्यमंत्री शिंदे यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आली असल्याचे त्यांनी सांगितेले होते. तसेच शिवसेनेला पुढे नेण्यात सीएम शिंदे यांचे मोठे योगदान असल्याचेही त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-07-2022 at 18:53 IST

संबंधित बातम्या