नारायण राणे कुटुंबीय आणि दीपक केसकर यांच्यातील वाद आणखी चिघळल्याचे दिसून येत आहे. या अगोदर भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) आणि दीपक केसरकर (deepak keskar) यांनी एकमेकांची लायकी काढली होती. त्यानंतर आता पुन्हा निलेश राणे यांनी ट्वीट करत केसकरांना खोचक टोला लगावला आहे. ‘१ तारखेपासून आमच्याकडे ड्रायवरची जागी रिकामी आहे. अर्ज करु शकता’, अस ट्वीट करत राणेंनी केसकरांना नोकरीची ऑफर दिली आहे.

“दिपक केसरकर म्हणतो, मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे. नोकरी मागायची आहे तर नीट मागा. १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे.” असे निलेश राणेयांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Jitendra Awhad sunil tatkare
“…म्हणून शरद पवार तुम्हाला भाजपाशी चर्चा करायला सांगायचे”, जितेंद्र आव्हाडांचा तटकरेंना टोला
Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
minister chhagan bhujbal on lok sabha polls
“नाशिकमधून महायुतीतर्फे तुम्ही उभे राहा, असे मला सांगण्यात आले,” छगन भुजबळ यांची माहिती; म्हणाले, “आता उमेदवारीचा मुद्दा…”
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”

लेश राणे आणि दीपक केसरकर यांच्यात वादाला सुरुवात

यापूर्वी भाजपाच्या कोणत्याही नेत्याने उद्धव ठाकरे किंवा मातोश्री विरोधात टीका करू नये, ती आम्ही खपवून घेणार नाही, अशी भूमिका शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी घेतली होती. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार देखील करण्यात आली होती. असं असताना देखील भाजपा नेते निलेश राणे हे सातत्याने ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर टीका करत होते. यावरून निलेश राणे आणि दीपक केसरकर यांच्यात वादाला सुरुवात झाली आहे.

निलेश राणेंचा केसकरांना इशारा

तुम्ही शिंदेसाहेबांच्या गटाचे प्रवक्ते असू शकता, आमचे नाही. तुमची लायकी आम्हाला चांगली माहीत आहे, त्यामुळे तुम्ही कशाला उड्या मारता? मतदारसंघात तुमची काय अवस्था आहे, हे आम्हाला माहीत आहे. तुम्हाला कुबड्या मिळाल्या आहेत. त्या कुबड्यावर तरी व्यवस्थित चाला, नाहीतर मतदार संघात तुमचा विषय आटोपला होता. तुम्हाला दुसरं राजकीय जीवनदान मिळालं आहे, हे विसरू नका. इज्जत मिळतेय तर इज्जत घ्यायला शिका, नाहीतर तुम्हाला माहिती आहे, आम्ही काही गप्प बसणार नाही,” अशा शब्दांत निलेश राणे यांनी केसरकरांना इशारा दिला होता.