“देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यांमध्ये काहीही तथ्य नाही”; अमरावती हिंसाचार प्रकरणावरून गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीसांनी असे वक्तव्य का केले याची माहिती घेईल असे दिलीप वळसे पाटील म्हणाले

no fact in the statements of Devendra Fadnavis Home Minister dilip walse patil response to Amravati violence case

त्रिपुरामध्ये घडलेल्या कथित घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावती, नांदेड, मालेगाव या ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. मात्र, या मोर्चांना हिंसक वळण लागले होते. अमरावतीमध्ये घडलेला प्रकार म्हणजे षडयंत्र होतं, अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती प्रकरणावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं होते. हा हिंसाचार सरकार समर्थित असल्याचे फडणवीसांनी म्हटले होते. त्यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“गडचिरोली आणि छत्तीसगडच्या सीमेवर नक्षलवाद विरोधी मोहिम नेहमीच चालू असते. बऱ्याच वेळेला दोन्ही बाजूने प्रतिकार होतो. १३ तारखेच्या कारवाईत २७ नक्षववाद्यांना कंठनस्थान घालण्यात पोलिसांना यश आले. गुप्तचर यंत्रणेकडून पोलिसांना याची माहिती मिळालेले असते. त्यानुसार पोलिसांनी गस्त घालण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर पोलिसांवर गोळींबार सुरु झाल्यानंतर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात नक्षलवादी ठार झाले,” असे दिलीप वळसे पाटील यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.

चौकशीचा निष्कर्ष आल्यानंतर कारवाई

त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्राच्या विविध भागात काढण्यात आलेल्या मोर्चानंतर जे घडले त्यावरही गृहमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती पण हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर होईल असे वाटले नव्हते. बांग्लादेशमध्ये घटलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी त्रिपुरामध्ये आंदोलने केली. तिथे घडलेल्या घटनांवरुन आणि घोषणांवरुन निषेध करण्यासाठी एका संघटनेने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. त्यामधून दगडफेक आणि इतर घटना झाल्या. ते शांत झाल्याच्या नंतर एका राजकीय पक्षाच्यावतीने बंदची हाक देण्यात आली होती आणि तिथे सुद्धा तसाच प्रकार घडला. ही बाब महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय दुर्दैवी आहे. पण अशा घटना घडत आहेत की घडवल्या जात आहेत यासंदर्भात आम्ही चौकशी करत आहोत. चौकशीचा निष्कर्ष आल्यानंतर कारवाई केली जाईल,” असे वळसे पाटील म्हणाले.

रझा अकादमीचा इतिहास पाहता त्याच्यावर बंदी घालण्याची वेळ आली आहे का यावरही गृहमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. “या संदर्भात मी पोलिसांना तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये जर त्यांची भूमिका दिसली तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल,” असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल – दिलीप वळसे पाटील

“”या घटनांमध्ये हिंदुत्ववादी संघटना आणि युवासेनेचा सुद्धा समावेश होता अशी माहिती पोलीस सूत्रांकडून आली आहे. त्याबाबत गृहमंत्र्यांनी भाष्य केले. यामध्ये कुठला राजकीय पक्ष आणि कुठला नेता आहे हे जास्त महत्त्वाचे नाही. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल,” असे गृहमंत्री म्हणाले.

“देवेंद्र फडणवीसांच्या मतांशी मी सहमत नाही आणि या वक्तव्यांमध्ये काहीही सत्य नाही. कारण जो राज्यकर्ता पक्ष असतो त्यांना राज्य चालवायचे असते. राज्य चालवत असताना कुणीतरी अशी घटना घडवून त्यामधून प्रयोग करेल आणि त्याचा नंतर उपयोग करेल हे बोलण्यात काही तथ्य नाही. या मोर्चांमध्ये परवानग्या घेण्यात आल्या नव्हत्या. रझा अकादमीने आणि बाकीच्या संघटनांनी स्वयंघोषित पणे हे मोर्चे काढले होते. त्यामध्ये भावनांचा उद्रेक करुन लोकांचा समावेश करण्यात आला,” असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

देवेंद्र फडणवीस हे जबाबदार व्यक्ती

“देवेंद्र फडणवीस हे जबाबदार व्यक्ती आहेत. ते राज्याचे गृहमंत्री होते. त्यांनी असे वक्तव्य का केले आणि त्यांच्याकडे काय माहिती आहे याबाबत मी माहिती घेईल. अशावेळी सर्वांनी सलोख्याने भूमिका मांडायला हवी. यामध्ये वातावरण बिघडेल असे वक्तव्य कोणाकडून येऊ नये. अमरावतीमध्ये शांतता असली तरी संचारबंदी आहे. पोलिसांना योग्य वाटल्यानंतर ते बंदी मागे घेतील. पण पोलिसांच्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात येत आहे,” असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

परमबीर सिंह यांच्या पत्रांमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न

 “मुंबई आणि ठाण्याच्या पोलीस स्थानकांमध्ये परमबीर सिंह यांच्याविरोधात काही तक्रारी दाखल झाल्या. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. ते चौकशीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांना फरार घोषित करण्यात आले. ही कायदेशीर प्रक्रिया आहे,” असे वळसे पाटील म्हणाले.

परमबीर सिंह यांच्या पत्रांमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे असे सिद्ध होत का याबाबतही  गृहमंत्र्यांना भूमिका मांडली. “परमबीर सिंह हे मुंबईचे पोलीस प्रमुख होते आणि आयुक्त असताना लिहिलेले पत्र, आरोप आणि आता माझ्याकडे पुरावे नाहीत हे सांगने एका दृष्टीने राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी हे केले का संशय निर्माण होतो,” असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: No fact in the statements of devendra fadnavis home minister dilip walse patil response to amravati violence case abn

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या