इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क हे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. मागील काही दिवसांपासून ते सोशल मीडिया कंपनी ट्विटरल खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहेत. दरम्यान, एकीकडे ट्विटर खरेदीचीही ही व्यवहार प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे ट्विटरला मस्क यांनी खरेदी केल्यास साधारणत: ७५ टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले जाईल, असा दावा केला जात आहे. याच कथित दाव्यावर आता ट्विटर कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. ट्विटर कंपनी मस्क यांनी खरेदी केल्यानंतरही या कंपनीत काम करणाऱ्या कर्चाऱ्यांना नोकरीवरून कमी केले जाणार नाही, असे ट्विटरने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>> Video: “आता भारतानंच ब्रिटनला आपली वसाहत करावं”; लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर ट्रेव्हर नोआहचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

ट्विटरचे जनरल काऊन्सिल सॉन एडजेट यांनी गुरुवारी (२० ऑक्टोबर) याबाबत अधिकचे स्पष्टीकरण दिले आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याला कमी करण्याचे कसलेही नियोजन नाही, असे ते म्हणाले आहेत. याआधी दी वॉशिंग्टन पोस्टने ट्विटरमधील कर्मचारी कपाती संदर्भात एक वृत्त दिले होते. या वृत्तानुसार एलॉन मस्क यांनी ट्विटरला खरेदी करताच येथे काम करणाऱ्या ७५०० कर्मचाऱ्यांपैकी साधारण ७५ टक्के कमर्चाऱ्यांना नोकरीवरून हटवले जाईल, असे आपल्या गुंतवणूकदारांना सांगतिले होते. मात्र हे वृत्त ट्विटरने फेटाळले आहे.

हेही वाचा >>>Padma Bhushan Award: सत्या नडेला यांना अमेरिकेत ‘पद्म भूषण’ प्रदान, विशेष सेवेसाठी भारताच्या नागरी पुरस्काराने सन्मानित

दरम्यान, दी वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्त दिलेले असले तरी, ट्विटरमधील कर्मचारीकपात सध्यातरी शक्य नसल्याचे म्हटले जात आहे. ट्विटरमधील एचआरनेदेखील याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. कर्मचारी कपात करण्याचा आमचा कोणताही विचार नसल्याचे एचआर विभागाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगितले आहे.