मुरुड ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर हे खूप प्रयत्नानंतर उपलब्ध झाल्यावर आता समस्याही त्यांच्या निवासस्थानाची राहिली आहे. तीन डॉक्टर पण निवासस्थान एकच असल्याने इतर डॉक्टरांनी कुठे राहावयाचे, हा प्रश्न गंभीर बनला आहे. डॉक्टरांसाठी काँक्रीटचे घर बनले आहे; परंतु त्यावर दरवाजे, खिडक्या तसेच अन्य सुविधा नसल्याने हे काम अर्धस्थितीतच आहे. आता या रुग्णालयांना डॉक्टर उपलब्ध झाल्याने निवासस्थान मिळावे ही सर्वसामान्य रुग्णांची मागणी होत आहे. रुग्णालयाजवळ निवासस्थान झाले तर रुग्णांना वैद्यकीय सेवा तातडीने मिळू शकते. याबाबत आमच्या प्रतिनिधीने मुरुड येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता कापरे यांची भेट घेऊन या निवासस्थानांबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, डिसेंबर-जानेवारीत ही निवासस्थाने पूर्ण झालेली असतील. लादी बसविणे, खिडक्या, दरवाजे व इतर सुविधा असे तुरळकच काम बाकी असल्याने हे काम तत्परतेने पूर्ण करण्याचा इरादा त्यांनी व्यक्त केला, तसेच ३० कॉटचे रुग्णालयाचे कामसुद्धा जलदगतीने सुरू आहे, तसेच डॉक्टरांसाठी असणारा मीटिंग हॉल याचे काम पूर्ण झाले असून, तोसुद्धा त्यांना लवकरात लवकर मिळेल. या वेळी आमच्या प्रतिनिधीने रुग्णांच्या हिताच्या दृष्टीने कामे तातडीने पूर्ण करण्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No quarter for rural hospital doctor in murud
First published on: 22-11-2012 at 07:03 IST