विधान परिषदेच्या २० जूनला होणाऱ्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातून यावेळी किमान डझनभर उमेदवार उभे राहणार असून प्रथमच राजकीय पक्ष आणि शिक्षण संस्थाचालक या निवडणूक आखाडय़ात उतरणार असल्यामुळे निवडणूक फारच चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट आहे. शिक्षक नसलेलेही उमेदवार या निवडणुकीत उतरले आहेत.
अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम व यवतमाळ या पाच जिल्ह्य़ातील जवळपास ४५ हजार शिक्षक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावेळीही २००८ च्या निवडणुकीप्रमाणे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघात फूट कायम असून विश्वनाथ डायगव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली रामदास बारोटे यांची विमाशिसंचे अधिकृत उमेदवार म्हणून अमरावतीच्या बठकीत ठरविण्यात आले आहे. विमाशिसंतर्फे आठ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. पकी सात जणांनी माघार घेऊन एकमताने रामदास बारोटे यांची उमेदवारी मान्य केल्याची माहिती विमाशिसंचे श्रावण बरडे यांनी सांगितले, तर दुसरीकडे विमाशिसंच्याच एका गटाने विद्यमान आमदार वसंत खोटरे यांचे प्रचार दौरे सुरू करून खोटरेंची उमेदवारी जाहीर केली आहे. २००८ च्या निवडणुकीत नुटाने खोटरेंना पािठबा दिला होता. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात नुटा ही प्राध्यापकांची संघटना कधीच उमेदवार उभा करीत नाही, तर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या उमेदवाराला पाठिंबा देत असते. कारण, पदवीधर मतदारसंघात विमाशिसं उमेदवार उभा न करता नुटा उमेदवाराला पाठिंबा देत असते. विमाशिसंमध्ये असलेल्या फुटीप्रमाणेच नुटातही फूट झाल्याचे चित्र आहे. नुटाच्या कार्यकारिणीचे माजी सदस्य व नुटा बुलेटीनचे माजी संपादक डॉ. सुभाष गवई यांनी उमेदवारी जाहीर करून प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. नुटाने अद्याप आपला पािठबा कोणाला राहील, हे जाहीर केले नाही.
आतापयर्ंत भाजप आणि परिवारातील संघटनांचा पािठबा असलेल्या महाराष्ट्र शिक्षक परिषदेच्या आणि नुटा व कांॅग्रेस समíपत विमाशिसंच्या उमेदवारांमध्येच लढत होत असे. दोन्ही संघटनांचे उमेदवार आलटून पालटून निवडून येण्याचाही इतिहास आहे. मात्र, यावेळी अमरावती विभागातील सर्वात मोठय़ा शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. अरुण शेळके मदानात उतरले आहेत, तर त्यांच्याच संस्थेत काम करणारे बुलढाण्याचे रामदास बारोटे यांची उमेदवारी विमाशिसंने जाहीर केली आहे. महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक परिषदेने बुलढाण्याचे श्रीकृष्ण अवचार यांचे नाव निश्चित केल्याचे वृत असून पंजाबराव देशमुख शिक्षक संघटनेचे शेखर भोयर हेही मदानात आहे. एकेकाळी शिवसेनेत महत्वाचे नेते असलेले श्रीकांत देशपांडे यांनीही एक संघटना स्थापन करून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. आतापयर्ंत विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदविधर मतदारसंघात लक्ष न घालणाऱ्या कांॅग्रेसने आता मात्र याही मतदारसंघात लढण्याचे घोषित केले आहे. अकोल्याच्या एका शाळेत मुख्याध्यापक असलेल्या प्रकाश तायडे यांच्या नावाची चर्चा कांॅग्रेसमध्ये आहे, तर राष्ट्रवादीच्या यवतमाळ जिल्हा महिला शाखेच्या माजी अध्यक्ष वर्षां निकम यांनी तर दोन महिन्यांपासून प्रचाराचा धडाका लावला आहे. शिक्षक भारतीच्या बॅनरवर त्या लढणार आहेत. या निवडणुकीत नुटाचा पािठबा कोणाला राहतो, यावर किमान चार उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
अमरावती विभाग विधान परिषद निवडणूक
पण उमेदवारांचे काय?
या मतदारसंघात मतदार पदविधर असलाच पाहिजे आणि शिक्षक मतदारसंघात मतदार शिक्षक असलाच पाहिजे, असा नियम आहे. शिक्षकाचा दर्जा माध्यमिक शिक्षकापेक्षा कमी नसावा आणि शिक्षक म्हणून किमान तीन वर्षे तो सेवेत असावा. पदवीप्राप्त करून तीन वर्षे झालेल्या पदवीधरास पदविधर मतदारसंघात मतदार म्हणून नाव नोंदवता येते, पण गंमत अशी की, उमेदवारासाठी मात्र कोणतीच शैक्षणिक पात्रतेची अट नाही. उमेदवार भारताचा नागरिक असावा व त्याच्या वयाला किमान तीस वर्ष पूर्ण झालेली असावी, एवढीच पात्रता असल्याने अंगठे बहाद्दर आणि शिक्षक नसलेली व्यक्तीसुध्दा निवडणूक लढवू शकते. अनेकांना ही बाब अतक्र्य वाटते, पण आपले प्रतिनिधित्व कोणी करावे, हे ठरवण्याचा हक्क मतदारांनाच आहे, असा तर्क सांगितला जातो.
हा घटनाकारांच्या हेतुलाच छेद -डॉ.गवई
या मतदारसंघात शिक्षक नसलेल्यांनी किंवा शिक्षण संस्थाचालकांनी अथवा राजकीय पक्षांनी निवडणूक लढवणे, याचा अर्थ घटनाकारांच्या हेतूलाच हरताळ फासणे होय, अशी संतप्त प्रतिक्रिया संत गाडगेबाबा अमरावती विद्यपीठाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ. सुभाष गवई यांनी येथे व्यक्त केली आहे. ही निवडणूक ते प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाचे उमेदवार म्हणून लढत आहे. शिक्षकांना अनेकदा शिक्षण संस्थाचालकांशी संघर्ष करावा लागतो. जर संस्थाचालकच उमेदवार असतील, तर ते शिक्षकांना कसा काय न्याय देतील, असा सवालही त्यांनी विचारला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th May 2014 रोजी प्रकाशित
शिक्षक नसलेल्यांनाही शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी
विधान परिषदेच्या २० जूनला होणाऱ्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातून यावेळी किमान डझनभर उमेदवार उभे राहणार असून प्रथमच राजकीय पक्ष आणि शिक्षण संस्थाचालक या निवडणूक आखाडय़ात
First published on: 26-05-2014 at 12:38 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Non teacher gets candidature for teacher constitution