नागपूर अमरावती मार्गावरील गोंडखैरीच्या बस स्थानकाजवळ एका ट्रक आणि बाईकची धडक होऊन भीषण अपघात झाला. ट्रक आणि बाईकची धडक होऊन बाईकचालक ट्रकच्या बोनेटमध्ये अडकले होता. तेवढ्यात मागून ट्रकला एका वेगवान कारनेही धडक दिली. या तिहेरी अपघातात काहीजण जखमी झाले. याच मार्गावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा जात होता. त्यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी ताफा थांबवून जखमींना मदत केली.

गोंडखैरी बसस्थानकाजवळ अपघात झाल्यानंतर तिथे बघ्यांची गर्दी जमली होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन ताफा थांबवण्याची सूचना केली. ते वाहनातून बाहेर पडले आणि त्यांनी ट्रकखाली अडकलेल्या तरुणाला बाहेर काढायला लावले. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे त्याला वेळेत उपचार मिळावेत याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ताफ्यातील रुग्णवाहिका तरुणाला दिली. या जखमी तरुणाला नागपुरातील रवी नगर चौकातील सेनगुप्ता रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Cafe Mysore
मुंबईतल्या कॅफे मैसूरच्या मालकाला २५ लाखाला लुबाडलं, ‘स्पेशल २६’ स्टाईल दरोडा
Malabar Hill, Malabar Hill Residents , made unique manifesto, Malabar Hill resident manifesto, Demand Action on Parking, Demand Action on Traffic, arvind sawant, Lok Sabha Elections, Mumbai news, malbar hill news, marathi news,
नेत्यांसाठी रस्ते बंद करू नका, मलबार हिलवासियांचा अनोखा जाहीरनामा; मुख्यमंत्र्यांवर रहिवासी नाराज
ajit pawar jitendra awhad 2
“पराभव दिसू लागल्यावर अजित पवारांचा नवा डाव, साखर कारखान्यातून…”, जितेंद्र आव्हाडांचा आरोप
jet airways founder naresh goyal marathi news, naresh goyal marathi news
नरेश गोयल यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढवा; पण जामीन मंजूर करू नका, ईडीची उच्च न्यायालयात मागणी, सोमवारी निकाल
voting, Amit Shah, Mahayuti,
मतदान पूर्ण होईपर्यंत थांबायचं नाही गड्या; अमित शहा यांचा कोल्हापुरातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना सल्ला
Violent Incident civil hospital thane, Patient s Relatives Attack Staff, civil Hospital Thane, Patient died at civil Hospital Thane, thane civil hospital staff and doctors protest, thane civil hospital, thane news, thane civil hospital news, thane news,
ठाणे जिल्हा रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू, नातेवाईकांनी केली कर्मचाऱ्यांना मारहाण; घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे आंदोलन
jayant patil, ajit pawar, jayant patil crticises ajit pawar, shivaji adhalrao patil, amol kolhe, shirur lok sabha seat, election campaign, public meet, lok sabha 2024, election 2024, marathi news, ncp sharad pawar,
पिंपरी : ज्यांना पाडले, त्यांचाच प्रचार; एवढी वाईट वेळ कोणावर येऊ नये… जयंत पाटील यांचा अजित पवारांना टोला
Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही

या व्यक्तीसह अन्य तिघांना मदत करून मुख्यमंत्र्यांनी त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांना दिले. या तरुणाला तत्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू झाले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः रुग्णालयात गेले होते. तिथे जाऊन त्यांनी जखमींची विचारपूस केली.

ट्रकखाली अडकलेल्या तरुणाचे नाव गिरीश केशरावजी तिडके असे असून तो नागपूरच्या गोंड खैरीवाडी येथील रहिवासी आहे. त्याच्याशिवाय या अपघातात जखमी झालेले वंदना राकेश मेश्राम (सिद्धार्थ नगरवाडी, नागपूर), रंजना शिशुपाल रामटेके (राहणार रामबाग मेडिकल चौक नागपूर) आणि शुद्धधन बाळूजी काळपांडे (राहणार मौदा नागपूर) यांनाही रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू झाले आहेत.