One killed truck crashes hill Amba Ghat highway accident ysh 95 | Loksatta

आंबा घाटात ट्रक डोंगरकडय़ावर आदळल्याने एक ठार

कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटात ट्रक डोंगरकडय़ावर आदळून झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली असून अन्य एकजण गंभीर जखमी झाले आहेत.

आंबा घाटात ट्रक डोंगरकडय़ावर आदळल्याने एक ठार
आंबा घाटात ट्रक डोंगरकडय़ावर आदळल्याने एक ठार

रत्नागिरी : कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटात ट्रक डोंगरकडय़ावर आदळून झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली असून अन्य एकजण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकचा चालक फरार आहे. याबाबतची माहिती अशी की, गुरुवारी रात्री कोल्हापूरहून जयगडकडे चाललेल्या ट्रकमध्ये (एमएच ११- डी डी ०९६७)  रत्नागिरीकडे जाणारे काही प्रवासी बसले होते. ट्रक आंबा घाटात आला असता एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक घाटातील डाव्या बाजूच्या डोंगरकडय़ावर जोरात आदळला. ट्रकच्या केबिनमध्ये बसलेल्या महिला सोनाबाई सखाराम लावनदे (वय ५८ वर्षे) या अपघातामध्ये  ठार झाल्या, तर ज्योतिबा बाबुराव लवनदे, (वय ५२) गंभीर जखमी झाले आहेत.  

सातारा जिल्ह्यातील वासोळे येथील एकाच कुटुंबातील आई, वडील, बहीण, मावस बहीण असे नातेवाईक या ट्रकमध्ये बसले होते. त्यापैकी रामकृष्ण सखाराम लवनदे, सोनाक्का बाबुराव लवनदे,  स्वाती प्रदीप पिसाळ, आरती योगेश झरंडे यांना किरकोळ मार लागला आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची हातखंबा येथील रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यातून मृत व जखमींना साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. अपघातानंतर  ट्रक चालक फरारी झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
संजय राठोडांना धक्का देत सुनील महाराज शिवसेनेत!

संबंधित बातम्या

राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा कार्यकर्त्यांना नव्हता थांगपत्ता; सिंधुदुर्ग जिल्ह्याची मनसे कार्यकारिणी बरखास्त
VIDEO: राऊतांना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली, शिवी देत म्हणाले, “*** तू यापुढे…”
“बाबासाहेब पुरंदरेंच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर…”, राज ठाकरेंच्या भेटीनंतर जयसिंगराव पवारांचा मोठा खुलासा
“सुषमा अंधारेंच्या मेंदुला…” राज ठाकरेंवरील टीकेला प्रत्युत्तर देताना मनसे नेत्याची जीभ घसरली!
“आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी…”, राज ठाकरेंचं मोठं विधान

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी बेळगावला येणं अनुकूल नाही”, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंचा इशारा
पोलीस उपनिरीक्षक विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेची निवड यादी जाहीर; यंदा डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शारीरिक चाचणी
‘मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या निर्णयाला जाणीवपूर्वक उशीर’; शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा आरोप
विजय दिवस सोहळ्यात यंदा भरगच्च कार्यक्रम; रौप्यमहोत्सवानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, शरद पवार यांना निमंत्रण
FIFA WC 2022: मोक्याच्या क्षणी ह्वांग ही चॅन चा गोल! द. कोरिया बाद फेरीत दाखल, मात्र जिंकूनही उरुग्वे विश्वचषकातून बाहेर