येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर ४० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दुपारी तीन-साडेतीनदरम्यान हा प्रकार घडला असावा. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली.
अधीक्षक कार्यालयालगत एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तेथे काम करणाऱ्या मजुरांना ही बाब लक्षात येताच पोलिसांना त्यांनी ही माहिती दिली. मृताची ओळख पटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून ओळख असलेल्या वजिराबाद परिसरात तीनमजली अत्याधुनिक पोलीस अधीक्षक कार्यालय आहे. बुधवारी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ४० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Feb 2016 रोजी प्रकाशित
पोलीस अधीक्षक कार्यालयात एकाची आत्महत्या
अधीक्षक कार्यालयालगत एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 04-02-2016 at 00:08 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One man suicide attempt in police superintendent office