बलात्काराच्या गुन्ह्यातील कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

कारागृहातील सांस्कृतिक सभागृहातील पत्र्याखाली असलेल्या लोखंडी अँगलला स्वतःच्या अंगावरील टी-शर्टने गळफास लावून त्याने आत्महत्या केली.

पावसाअभावी वाया गेलेली पिके आणि आर्थिक विवंचनेमुळे पाटखळ (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथील शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

बलात्काराच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली.

उस्मानाबाद येथील जिल्हा कारागृहामध्ये बलात्कार आणि पोस्कोच्या गुन्ह्यात योगेश उर्फ रुद्र शिवाजी शिंपले (वय १८, रा. चोंदे गल्ली, कळंब, जि. उस्मानाबाद) हा १५ मे २०१८ पासून शिक्षा भोगत होता. बुधवारी सकाळी कारागृहातील सांस्कृतिक सभागृहातील पत्र्याखाली असलेल्या लोखंडी अँगलला स्वतःच्या अंगावरील टी-शर्टने गळफास लावून त्याने आत्महत्या केली. याप्रकरणी जिल्हा कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आनंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दासरवाड करत आहेत.

खोलीमध्ये कोणीही नसताना त्याने रुमच्या अँगलला टी शर्टने गळफास घेतल्याचे आढळून आले. ही माहिती मिळताच आनंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक तानाजी दराडे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करण्याचे काम सूरु असून सध्या तरी आत्महत्येचे कारण सांगता येणार नसल्याचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Osmanabad prisoner suicide in jail

ताज्या बातम्या