सांगली : मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र, कुणबी दाखले देउन मराठा समाजाला कोणत्या वर्गातून आरक्षण शासन देणार हे स्पष्ट करावे, जर ओबीसी कोट्यातून आरक्षण देणार असाल तर आमचा विरोध राहील असे महाराष्ट्र ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदेचे सरचिटणीस संग्राम माने यांनी मंगळवारी विटा येथे सांगितले.

आणखी वाचा-“ओबीसी समाजात संभ्रम निर्माण करू नये”, एकनाथ शिंदेंचा छगन भुजबळांना इशारा; म्हणाले, “मराठा समाजाला…”

sharad pawar
शरद पवारांचे एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र; सरकारला इशारा देत म्हणाले…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Finance department, Gulabrao Patil,
अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही, गुलाबराव पाटील यांचा कोणावर रोख ?
president Draupadi Murmu, crimes against women, Kolkata doctor rape-murder, Alka Lamba, Congress criticism, Manipur violence, women’s empowerment,
माफ करा… राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूजी…काँग्रेसच्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष असे का म्हणाल्या ?…
Antar Singh Aryas appeal to youth says responsibility of youth to save tribals
आदिवासींना वाचविण्याची युवापिढीवर जबाबदारी, युवा संवादमध्ये अंतरसिंग आर्या यांचे आवाहन
rohit pawar
Rohit Pawar : राज्यातील महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून रोहित पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाले, “उद्या महाराष्ट्रात येत आहात, तर…”
ST employees Congress, ST bus, Maharashtra ST bus,
तोट्यातल्या एसटीला शासनाकडूनच कोट्यवधींचा चुना; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस म्हणते…
Anil Deshmukh, Shakti Act,
महाराष्ट्रात ‘शक्ती’ कायद्याला केंद्रामुळे विलंब? माजी गृहमंत्र्यांनी थेटच…

माने म्हणाले, सध्या राज्यात सरसकट मराठा समाजाला कुणगी प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली सुरू आहेत. मराठा समाजातही आर्थिकदृष्ट्या मागासलेले लोक आहेत. अशांना शिक्षणात व नोकरीमध्ये आरक्षण मिळण्यास आमचा विरोधच नाही. मात्र, ओबीसी समाजाने पन्नास वर्षे संघर्ष करून आरक्षण मिळवले आहे. त्या कोट्यातूनच जर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला तर हा ओबीसीवर अन्याय ठरेल. हे आमचा समाज मान्य करणार नाही. यासाठी पुन्हा संघर्ष करावा लागला तर यासाठी आमची तयारी आहे. ओबीसी नेत्यांनी पक्ष न पाहता समाजासाठी एकत्र येउन हा लढा लढण्याची गरज आहे असेही माने यांनी सांगितले.