पालघर : आंतरराज्य दरोडेखोरांची टोळी पकडण्यास पोलिसांना यश

२०१३ मध्ये वसई येथील ॲक्सिस बँकेवरील दरोडयात सहभाग

पालघर : जिल्ह्यात, राज्यात तसेच इतर राज्यात दरोडा टाकणाऱ्या एका टोळीच्या चार सदस्यांना पालघर पोलिसांनी अटक केली आहे.

जिल्ह्यात, राज्यात तसेच इतर राज्यात दरोडा टाकणाऱ्या एका टोळीच्या चार सदस्यांना पालघर पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी गुजरात व मुंबई येथील दरोड्यांमध्ये सहभागी झाल्याची शक्यता असून या आरोपीना १५ जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस स्टेशनच्या हद्दीत युनायटेड पेट्रोल फायनान्स गोल्ड व व्हॅल्युअर आयटीआय गोल्डन शॉप याठिकाणी २० सप्टेंबर २०१९ मध्ये सहा व्यक्तींनी दरोडा टाकून एक कोटी ७६ लाख रुपयांच्या किमतीचे ऐवज चोरला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व नालासोपारा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या प्रयत्नाने ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे ४० लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.

या टोळीने सन २०१३ मध्ये वसई येथील ॲक्सिस बँकेवर दरोडयात सहभागी झाल्याचीही कबुली दिली असून याप्रकरणी ३ कोटी ८७ लाख रुपये लुटण्यात आले होते. या टोळीकडून दोन पिस्तूल व आठ काडतूसं पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
या कामगिरीत सहभागी पोलिसांना पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी प्रत्येकी १५ हजार रुपयांचे बक्षीस व प्रशस्तीपत्र देण्याचे जाहीर केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Palghar police succeed in nabbing a gang of inter state robbers aau

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या