शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे शरद पवार यांचेच पाप आहे असा आरोप कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला. शरद पवार हे देशाचे कृषी मंत्री होते तेव्हाही लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे स्वयंपूर्ण झाला पाहिजे अशी भूमिका त्यावेळी शरद पवारांनी घेतली असती तर आज ही वेळ आलीच नसती असेही पटेल यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे शरद पवार शेतकऱ्यांना चिथावणी देत आहेत असाही आरोप पाशा पटेल यांनी केला.

राज्यातील शेतकरी संपावर गेले असून त्याला शरद पवारांनी पाठिंबा दिला असून टोकाची भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.अशा प्रकारची चिथावणी करणे योग्य नसल्याची भूमिका पाशा पटेल यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषेदत मांडली. त्यांनी शरद पवार यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज मुंबईत राज्यातील शेतकयांच्या संपाला पाठिंबा दर्शवत.टोकाची भूमिका घेतल्याशिवाय पर्याय नसल्याची भूमिका मांडली. त्याच वक्तव्यावर  पुण्यात पाशा पटेल यांची पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्या विधानावर त्यांनी सडकून टीका केली.

पाशा पटेल म्हणाले की, मागील २५ वर्षांपासून ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी शेतकऱ्याची अवस्था अत्यंत वाईट केली आहे.तेव्हा पासून शेतकयाच्या आत्महत्या होत आहे.त्यावेळी शरद पवार हे देखील सत्तेमध्ये होते.या २५ वर्षाच्या काळात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे कृषीमंत्री पद देखील भूषवले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी कोणते चांगले धोरण आणले?

शरद पवार यांनी देशाचे  १० वर्षे कृषीमंत्री त्या दरम्यान स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी का  लागू केल्या नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित करीत ते त्यांचे दिवस विसरले असून त्यांच्या सरकारच्या धोरणामुळे शेतकयाची अशी अवस्था झाली आहे. राज्यातील शेतकरी संपावर गेला असताना अशा परिस्थितीमध्ये शरद पवार यांनी हा संप कशा प्रकारे मिटेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज होती.मात्र त्यांनी टोकाची भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.अशा प्रकारची चिथावणी करणे योग्य नाही.असे सांगत शेतकयांनी त्यांच्या राजकीय डावाला बळी न पाडण्याचे आवाहन देखील यावेळी केले.