नाशिक ते निफाडदरम्यान हावडा एक्स्प्रेसमध्ये सामान्य डब्यात तीन जणांनी चाकूचा धाक दाखवीत एका प्रवाशाकडील १५ हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेतले.
मुंबई-हावडा ही गाडी रात्री नाशिकरोडहून निघाल्यावर खेरवाडी स्थानकाच्या पुढे गेल्यावर सामान्य डब्यात असलेल्या दोन जणांनी प्रवाशांना चाकूचा धाक दाखवीत दमदाटी व मारहाण करण्यास सुरुवात केली. राजू पलटी (२८, भायखळा, मुंबई) या प्रवाशाकडील १५ हजारांची रोकड बळजबरीने हिसकावून घेतली. धावत्या गाडीत १५ ते २० मिनिटे हा प्रकार सुरू होता. काही प्रवाशांनी साखळी खेचून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता निफाड रेल्वे स्थानकाजवळ लुटारूंनी पळ काढला. गाडी मनमाड स्थानकात आल्यावर प्रवाशांनी स्थानिक प्रशासनाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. पण गाडी जास्त वेळ थांबत नसल्याने अखेर प्रवाशांनी भुसावळ स्थानक येताच लोहमार्ग पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jun 2013 रोजी प्रकाशित
हावडा एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला लुटले
नाशिक ते निफाडदरम्यान हावडा एक्स्प्रेसमध्ये सामान्य डब्यात तीन जणांनी चाकूचा धाक दाखवीत एका प्रवाशाकडील १५ हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेतले. मुंबई-हावडा ही गाडी रात्री नाशिकरोडहून निघाल्यावर खेरवाडी स्थानकाच्या पुढे गेल्यावर सामान्य डब्यात असलेल्या दोन जणांनी प्रवाशांना चाकूचा धाक दाखवीत दमदाटी व मारहाण करण्यास सुरुवात केली.
First published on: 10-06-2013 at 03:46 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passanger robbed in howara express