काँग्रेस-राष्ट्रवादीचे हिंगोलीत मनोमिलन

हिंगोली मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नाराज कार्यकर्त्यांची प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी समजूत काढली. त्यानंतर राष्ट्रवादी व काँग्रेस पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक झाली. चच्रेअंती दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन होऊन कार्यकत्रे आघाडीचे उमेदवार राजीव सातव यांच्या प्रचारात सामील झाले.

हिंगोली मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नाराज कार्यकर्त्यांची प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी समजूत काढली. त्यानंतर राष्ट्रवादी व काँग्रेस पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक झाली. चच्रेअंती दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन होऊन कार्यकत्रे आघाडीचे उमेदवार राजीव सातव यांच्या प्रचारात सामील झाले.
िहगोली मतदारसंघ पूर्वी राष्ट्रवादीकडे होता. काँग्रेसने तो सातवसाठी सोडवून घेतल्याने माजी मंत्री सूर्यकांता पाटील व माजी खासदार शिवाजीराव माने यांचे समर्थक नाराज हेते. मात्र, किनवटचे आमदार प्रदीप नाईक, वसमतचे आमदार जयप्रकाश दांडेगावकर व पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, शेळी-मेंढी विकास मंडळाचे अध्यक्ष रामराव वडकुते आदींनी प्रचारास प्रारंभ केला होता. मात्र, सूर्यकांता पाटील व माने समर्थक नाराज असल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या दुफळीबद्दल जोरदार चर्चा सुरू होती. त्यातच पाटील यांच्या उपस्थितीत चिंचोलीत केशव नाईक यांच्या शेतावर नाराजांची बठक झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. त्याची दखल घेत उमेदवार सातव, आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांनी नाराज कार्यकर्त्यांचा रुसवा काढण्यास प्रयत्न केले. मंगळवारी प्रदेश कार्याध्यक्ष आव्हाड िहगोलीत येऊन गेले. त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या व या मुद्यावर उमेदवारांशी चर्चा करून सर्वाची संयुक्त बठक लवकरच घेण्याबाबत त्यांना सूचना देतो, असे नाराज कार्यकर्त्यांना सांगितले. आव्हाड दुपारी बठक घेऊन गेल्यानंतर माजी नगराध्यक्ष गणेश लुंगे यांच्याकडे माजी खासदार माने, रामराव वडकुते, नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी नगराध्यक्ष जगजित खुराणा, उपाध्यक्ष शेख निहाल अहेमद, केशव नाईक, अप्पाराव देशमुख, तर काँग्रेसचे सातव, आमदार गोरेगावकर व त्यांच्या समर्थकांची रात्री बठक झाली. बठकीत दिलीप चव्हाण, जगजित खुराणा, माधव कोरडे, संजय बोंढारे यांनी आपल्या व्यथा मांडल्या.
कयाधू नदीवरील बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लागावा. विकासात आमचाही खारीचा वाटा असल्याचे श्रेय आम्हाला मिळावे, ही आमची अपेक्षा असताना आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात होते, असा आरोप करून मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विश्वास संपादन व्हावा, एकमेकाला समजून घेण्याची गरज आहे, अशी भावना माने यांनी व्यक्त केली. पक्षाचे नेते शरद पवार यांच्या निर्णयाप्रमाणे आघाडीचा धर्म पाळू, याबद्दल उमेदवाराने नििश्चत राहावे, अशी ग्वाही त्यांनी दिली. या वेळी सातव व गोरेगावकर यांनी आपसातील गरसमज दूर झाल्याचे सांगून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे आभार मानले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Patch up of ncp congress in hingoli