रेल्वेमधून पडूनही वाचलेल्या व्यक्तीने उपचारासाठी सेवाग्रामच्या रूग्णालयात दाखल झाल्यानंतर पंख्याला गळफास घेऊनआत्महत्या करण्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

तामिळनाडूतील काचीपूरम येथील बाबू त्यागराज शेट्टीवार असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारी रात्री या व्यक्तीस रेल्वे पोलिसांनी सेवाग्रामच्या कस्तुरबा रूग्णालयात दाखल केले होते. तो रेल्वेतून पडला की? त्याने उडी मारली हे निश्चित नसतांना त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते व त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याची स्थिती धोक्याबाहेर असल्याचे स्पष्ट झाल्याने, रविवारी त्याची माहिती घेऊन नातेवाईकांना कळविण्याची तयारी सुरू झाली होती. मात्र रविवारी रात्रीच त्याने खाटेवरील चादर पंख्याला बांधून आत्महत्या केल्याचे आज(सोमवारी) निदर्शनास आले. त्यानंतर एकच खळबळ उडाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रूग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी गिरिष देव म्हणाले की, आज सदर रूग्णास सुट्टी देण्यात येणार होती. त्यासाठी रेल्वे प्रशासनास कळविण्यात आले होते. मात्र प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही. एकही रूग्ण नसणाऱ्या अतिदक्षता विभागात हा रूग्ण कसा गेला, याविषयी सगळेच अनभिज्ञ आहेत. त्याची चौकशी केल्या जाईल. याबाबत पोलिसांना सर्व माहिती देण्यात आली आहे. सेवाग्राम पोलिसांनी या प्रकरणी डॉ. आशिष दुधे यांची तक्रार दाखल करून घेतली आहे.