संभाजी भिडेंना आदराने ‘गुरुजी’ म्हणतात ही शोकांतिका

सातारा: एक जबाबदार लोकप्रतिनिधी असताना आपल्याला मते देऊन निवडून आणणाऱ्या दलित समाजाला कस्पटासमान समजणारे आणि अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल जाहीरपणे भाष्य करणारे खा. उदयनराजे भोसले आमच्या लेखी राजे नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आमच्या लेखी राजे आहेत. राजाने राजासारखे वागावे. आम्ही त्यांचा सन्मान करतो पण उदयनराजेंना आम्ही राजे मानत नाही,’ अशा शब्दात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी शनिवारी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर थेट साताऱ्यातचं तोफ डागली.

ratnagiri sindhudurg lok sabha marathi news
रत्नागिरीत महायुतीपुढे कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान
kolhapur mla prakash awade, claim on hatkanangale lok sabha seat
“मी महायुतीचाच! मोदींना पंतप्रधान करण्यासाठी लढणार”, बंडखोर आमदार प्रकाश आवाडे यांचा पवित्रा
sangli Mahavikas Aghadi
मविआची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर होताच कॉंग्रेस संतप्त, बैठकीत पुढील निर्णय – आमदार सावंत
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा मेळावा शनिवारी सातारा येथे झाला. या मेळाव्यास जयदीप कवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यानंतर कवाडे यांनी पत्रकारांशी बातचित केली. या पत्रकार परिषदेस जिल्हा कार्याध्यक्ष संजय गाडे, जिल्हा महासचिव संतोष सपकाळ, युवराज कांबळे आदी उपस्थित होते.

पीपल्स रिपब्लिकनची भूमिका मांडत असताना त्यांनी भारिप बहुजन महासंघाचे ॲड. प्रकाश आंबेडकर, खासदार उदयनराजे भोसले, संभाजी भिडे यांच्यावर टीका केली. उदयनराजेंच्या एका वक्तव्याच्या अनुषंगाने कवाडे यांना पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले, आम्ही त्यांना राजे मानतच नाहीत. आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर आहे. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने ‘छत्रपती’ आहेत. शिवाजी महाराज आणि बाबासाहेबच आमच्यासाठी राजे आहेत. राजाने राजासारखे वागावे. उदयनराजे हे संभाजी भिडेंना आदराने गुरुजी म्हणतात ही शोकांतिका आहे. ज्यांचा सांगलीच्या दंगलीत सहभाग आहे त्यांच्याबदद्दल जर उदयनराजे गौरवोद्गार काढत असतील तर ते चुकीचे आहे. भीमा कोरेगाव दंगलीत मिलींद एकबोटे आणि संभाजी भिडे यांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकबोटे यांना अटक झाली. मात्र, भिडे दोषी असूनही त्यांना अटक नाही. त्याचे काय करणार, याचेही उत्तर भाजपा सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

आंबेडकरांचे नातू म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्या विषयी आदर आहे. ते देशाचे नेते आहेत. त्यांना ‘एमआयएम’ चालते परंतू आम्ही अथवा अन्य रिपब्लीकन पक्ष चालत नाहीत, असे सांगून कवाडे म्हणाले, ज्याप्रकारे भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करते तशीच भूमिका ‘एमआयएम’ वठवत आहे. त्याच ‘एमआयएम’बरोबर प्रकाश आंबेडकर जात आहेत. राजकारण असो अथवा समाजकारण असो, आमची भूमिका ठरलेली आहे. कोणत्याही रिपब्लीकन नेत्यांवर टीका करायची नाही. प्रकाश आंबेडकरांना जशी इतर नेत्यांची ॲलर्जी आहे, तशी आम्हाला नाही. आगामी निवडणुकीत आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबरच राहणार आहे. आम्ही शोबाजी करत नाही तर प्रत्यक्षात काम करतो. आम्ही आता देशभरात संघटना भक्कम करण्यावर भर देत आहोत, असे त्यांनी सांगितले.