मुंबई : केंद्र सरकारपाठोपाठ राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही रविवारी इंधन करकपात करून नागरिकांना दिलासा दिला़  राज्य सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित करात २ रुपये ०८ पैसे, तर डिझेलवरील करात १ रुपया ४४ पैसे कपात केली़

केंद्र सरकारने पेट्रोलवरील अबकारी करात ८ रुपये तर डिझेलवरील करात सहा रुपये कपात शनिवारी केली होती. राज्य सरकारांनीही मूल्यवर्धित करात कपात करावी, अशी सूचना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने हे पाऊल उचलल़े  इंधनावरील मूल्यवर्धित करात कपात करण्यात आल्याने महाराष्ट्राच्या तिजोरीवर सुमारे २५०० कोटींचा वार्षिक बोजा पडणार आहे.

Balasaheb Thorat
अशोक चव्हाणांच्या जाण्याने नांदेडमध्ये काँग्रेसला फटका बसणार? बाळासाहेब थोरात म्हणाले, “जर ते…”
Hindutva organization, BJP, Solapur,
सोलापुरात भाजपच्या पाठीशी हिंदुत्ववादी संघटना
Praniti Shinde, Solapur,
सोलापूरचे भाजपचे दोन्ही खासदार सतत दहा वर्षे नापासच, प्रणिती शिंदे यांची टीका
Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ एप्रिलला राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे घेतलेल्या बैठकीत बिगर-भाजपशासित राज्यांनी इंधनावरील करात कपात करण्याची सूचना केली होती. मात्र, त्यावेळी राज्य सरकारने करात कपात करण्याचे टाळले होते. त्यावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले होते.

आता इंधनदरापाठोपाठ महागाई वाढत असल्याने केंद्राने अबकारी करात कपात करण्याचा निर्णय घेतला़  त्यापाठोपाठ काही राज्यांनीही करकपात केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही हाच कित्ता गिरवत नागरिकांना दिलासा दिला़ सध्या राज्यात पेट्रोलच्या लिटरमागील दरात राज्याचा कर हा ३२ रुपये ५५ पैसे होता. त्यात आता २ रुपये ०८ पैसे कपात होईल. डिझेलवर २२ रुपये ३७ पैसे हा राज्याचा कर होता. त्यात १ रुपया ४४ पैसे कपात करण्यात आली आहे. या दर कपातीमुळे राज्यातील इंधन नक्की किती स्वस्त होईल, हे सोमवारी तेल कंपन्यांकडून दर निश्चिती झाल्यावरच समजू शकेल, असे पेट्रोल-डिझेल विक्रेत्यांच्या संघटनेकडून सांगण्यात आले.

केंद्राने गेल्या नोव्हेंबरमध्ये इंधनावरील अबकारी करात वाढ केली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढत असताना करवाढ केल्याने टीका झाली होती. नागरिकांना त्याचा फटका बसू नये, यासाठी केंद्राने राज्यांना मूल्यवर्धित करात कपात करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार भाजपशासित राज्यांनी इंधनाच्या दरात कपात केली होती. बिगर- भाजपशासित राज्यांनी मात्र करात कपात करण्याचे टाळले होते. त्यावरून पंतप्रधान मोदी यांनी बिगर- भाजपशासित राज्यांना कानपिचक्याही दिल्या होत्या.

राज्यात पेट्रोलवरील कर हा केंद्राच्या दरापेक्षा अधिक होता. तो कर कमी करण्याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी केले होते. पण, केंद्राने पेट्रोलवरील कर ८ रुपये तर डिझेलवरील कर ६ रुपये कमी केल्याने महाविकास आघाडी सरकारला कर कपातीशिवाय पर्याय नव्हता. अन्यथा, विरोधकांना टीका करण्यास वाव मिळाला असता.  भाजपशासित कर्नाटकने यापूर्वीच इंधनावरील करात कपात केली होती.

करकपातीचा संपूर्ण भार केंद्रावरच

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करकपात ही पेट्रोलियम उत्पादनांवर आकारण्यात येणाऱ्या ‘रस्ते आणि पायाभूत उपकरात’ (आरआयसी) करण्यात आली आहे. करकपातीचा हा संपूर्ण भार केंद्र सरकारवर पडेल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी स्पष्ट केले. राज्यांना देय असलेल्या पेट्रोलियम उत्पादनांवरील मूलभूत अबकारी शुल्काला हात लावला नसल्याने राज्यांनी चिंता करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सूचित केले.

अन्य राज्य सरकारे इंधनात ७ ते १० रुपये करकपात करीत असताना महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याने दीड ते दोन रुपये कपात करून सामान्य नागरिकांची क्रूर थट्टा केली आह़े  महाविकास आघाडी सरकारने मनाचा थोडा मोठेपणा दाखविला असता तर बरे झाले असत़े 

देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

कोणत्या राज्यांकडून किती करकपात?

महाराष्ट्र  पेट्रोल २ रुपये ०८ पैसे, डिझेल १ रुपये ४४ पैसे

राजस्थान  पेट्रोल – २ रुपये ४८ पैसे, डिझेल १ रुपये १६ पैसे

केरळ पेट्रोल २ रुपये ४१ पेसे, डिझेल १ रुपया ३६ पैसे