डिजिधन मोहीम ही भ्रष्टाचाराविरोधातील सफाई अभियान असून केंद्र सरकारच्या डिजिधन मोहीमेत सहभागी होणारे हे भ्रष्टाचाराविरोधातील लढाईतील सैनिक आहेत असेही ते म्हणालेत.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतूनच भीम अॅपची निर्मिती झाल्याचे मोदींनी सांगितले. गोरगरीबांनाही डीजीधन हे निजीधन (स्वत:चे धन) वाटेल तो दिवस दूर नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. मोदींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. दीक्षाभूमी हे देशातील नव्हे तर जगातील बौद्ध धर्मीयांचे एक प्रमुख केंद्र आहे. Dr Baba Saheb Ambedkar Jayanti  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. आंबेडकर जयंतीनिमित्त मोदींनी या दीक्षाभूमीवर जाऊन आंबेडकर यांना अभिवादन केले. पेपरलेस अर्थव्यवस्थेचे दिवस आता दूर नसून पूर्वी अंगठा म्हणजे निरक्षरतेचे लक्षण होते. पण आता हाच अंगठा तुमची ताकद बनेल असे त्यांनी सांगितले. लोक मोबाईलवर अंगठा वापरुन कॅशलेस अर्थव्यवस्थेचा भाग होत असल्याचे मोदींनी सांगितले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाची आठवण करुन देत मोदी म्हणाले, स्वातंत्र्यलढ्यात अनेकांना स्वतःच्या प्राणाची आहुती द्यावी लागली. डिजिधन मोहीम म्हणजे भ्रष्टाचाराविरोधातील लढाई असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी नागपूरमध्ये आले असून त्यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे उद्घाटनही पार पडले. दीक्षाभूमीवरुन नरेंद्र मोदी कोराडी येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात गेले. तिथे केंद्रातील दोन नवीन संचाचे त्यांनी उद्घाटन केले. त्या सोहळ्यानंतर मानकापूरस्थित क्रीडा संकुलात नीती आयोगातर्फे आयोजित डीजीधन मेळावा पार पडला.

मोदींच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थाही कडेकोट ठेवण्यात आली होती.विमानतळापासून ते कोराडी येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रापर्यंत एकूण २ हजार २०० पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात होते. याशिवाय पंतप्रधानांच्या मार्गावरील सुरक्षेवर नजर ठेवण्यासाठी ‘ड्रोन’चाही वापर करण्यात आला. कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या कार्यक्रमासाठी दहेगाव- ड्रॅगन पॅलेस- कामठी रोड आणि दहेगाव ते नागपूर शहरात येणाऱ्या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली होती.

UPDATE:

२.२३: भिम अॅपची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा

२.२२ :  ऊर्जेशिवाय विकास शक्य नाही

२.२२: २०२२ पर्यंत प्रत्येक गरीबाला स्वतःचे घर मिळेल

२.२० : ऊर्जा प्रत्येक माणसाचा अधिकार आहे – मोदी

०१:५४: विकासाचे कोणतेही स्वप्न उर्जेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही: मोदी

१:३०: डिजीधन मेळाव्यात डिजिधन योजनेतील विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण

१२:३५: मनकापूर क्रीडा संकुलात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आधार पे अॅपचा शुभारंभ

१२:१२: दीक्षाभूमीनंतर मोदींनी कोराडीत जाऊन औष्णिक विद्यूत वीज निर्मिती प्रकल्पातीन नव्या वीज संचाचे लोकार्पण केले.