पोलादपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आंबेनळी घाटात दाभिळ टोक येथे दरड पडली असल्याने पोलादपूर ते महाबळेश्वर मार्गाची वाहतूक बंद झाली आहे. पोलादपूर येथे शिवाजी चौक येथे बॅरिकेट लावून वाहतूक बंद केली गेली आहे.
महाबळेश्वर पोलीस ठाणे येथून कळविण्यात आले आहे की, महाबळेश्वर हद्दीमध्ये देखील रस्ता खचला असून झाडे रस्त्यावर पडली आहेत. त्या मार्गे येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे जोपर्यंत महाबळेश्वरकडून पोलादपूरकडे येणारी वाहतूक चालू केली जात नाही, तोपर्यंत पोलादपूर ते महाबळेश्वर वाहतूक सुरू करू नये.