अंबरनाथ येथे स्वातंत्र्यदिनी भर दिवसा झालेल्या केबल व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींनी अटक केली आहे. रवि गुंजाळ, गणेश गुंजाळ आणि सचिन धोत्रे अशी त्यांची नावे असून ते वडवली भागातील रहिवासी आहेत. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज असून न्यायालयाने त्यांना २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.