येथील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचा निकटवर्तीय कैलास मुदलियारला पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक केली. नाशिक रोड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या कैलास मुदलियारने राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपली प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न केला. पक्ष आणि स्वत:च्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नाशिक रोड परिसरासह अन्य ठिकाणी त्याने काही महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले. २०१२ मध्ये आर्टिलरी सेंटर येथे एकावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यात शाम खोले, नितीन अहिरे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी योगेश चव्हाण यांच्या तक्रारीनुसार मुदलियारसह अर्जुन पिवाल, कॅप्टन कपू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मुदलियारला पोलिसांनी अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याची रवानगी नाशिक रोड कारागृहात करण्यात आली. दरम्यान, मुदलियारविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत प्राणघातक हल्ले, खंडणी, मारहाण, शस्त्रास्त्रे बाळगणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrested to chhagan bhujbal friend kailash mudaliar in murder case
First published on: 04-08-2016 at 00:02 IST