खामगावनजीकच्या वाडी येथे अड्डय़ावर २७ एप्रिलच्या सकाळी ३.३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून ८ जणांना अटक केली, तसेच त्यांच्या ताब्यातून नगदी व इतर, असा सुमारे लाखाचा ऐवज जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी २७ एप्रिलला सकाळी वाडी येथील एका घरात सुरू असलेल्या जुगाराच्या डावावर छापा टाकला असता विश्वास बाबुराव धोरण, गजानन रामदा पाटील, सचिन वासुदेव नागलकर, सुरज वसंत सोनार, प्रशांत दिनकर कर्णिक (३६), प्रशांत तेजराव पाटील, सचिन नामदेव पाटील (३२), विजय सुरेश प्रांजळे (२५,सर्वे रा.वाडी) हे एक्का बादशहा नावाचा जुगार खेळतांना आढळून आले.
पोलिसांनी या जुगारीकडून २१ हजार रुपये, ११ मोबाईल, दोन मोटारसायकली, असा एकूण १ लाख २ हजार ३० रुपयांचा ऐवज जप्त केला.
याप्रकरणी पोलिस निरीक्षक दिलीप पाटील त्यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अक्षय्यतृतीय  जवळ येत असून घाटाखाली अनेक ठिकाणी जुगार खेळण्यात येतो. ग्रामीण भागातही अनेक भागात जुगार अड्डे सुरू  आहेत. त्याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष दिसून येत आहे. याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, अशी मागणी परिसरातून व्यक्त होत आहे.