राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेचा आज नागपुरात समारोप झाला. यानंतर रोहित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी विधानभवन परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखलं. मात्र, कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडले आणि जबरदस्तीने आत शिरण्याचा प्रयत्न केला. त्यावर पोलिसांनी लाठीमार करत रोहित पवार आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतलं आहे.

रोहित पवारांना पोलीस ताब्यात घेत असताना घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला. उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. याबाबतचा एक व्हिडीओही समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित पवार यांनी काय म्हटलं?

आम्ही शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे आणि युवकांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही संघर्ष यात्रा काढली होती. सरकारला आम्ही निवेदन दिलं होतं की आमच्या मागण्या आणि आमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी सरकाचा प्रतिनिधी पाठवला गेला पाहिजे. मात्र इथे शहर अध्यक्षांना पाठवण्यात आलं. ही आमच्या यात्रेची थट्टा आहे. आम्ही यात्रा संपल्यानंतरही १५ मिनिटं वाट पाहिली मात्र कुणीही आलं नाही त्यामुळे यात्रा विधानभवनाकडे धडकवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आम्हाला अशा प्रकारे अडवलं गेलं आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.