सोलापूर : महिलांवर अत्याचार होऊ नयेत म्हणून पोलीस यंत्रणेने अधिक सतर्क राहावे. साध्या वेषातील पोलिसांची संख्या वाढवावी. भरोसा सेलमध्ये नोंद होणारे गुन्हे कार्यवाही करून निकाली काढावेत. एकाही महिलेवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार होणार नाही यासाठी कौटुंबिक संरक्षण कायद्यानुसार महिला सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

सोलापुरात शासकीय विश्रामगृहात आयोजित विविध विभागाच्या आढावा बैठकीत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवि पवार, सोलापूर शहर पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलांना भरोसा कक्षाच्या माध्यमातून दक्षता समिती सक्षम करण्याची गरज आहे. दक्षता समितीने प्राचार्य, शिक्षिका, प्राध्यापिका, समाजसेविका, सरपंच यांना कौटुंबिक संरक्षण कायद्याचे प्रशिक्षण द्यावे. जिल्हा परिषद, महिला बाल विकास विभाग व पोलीस विभागाने संयुक्तपणे लोक अदालत आयोजित करून कौटुंबिक गुन्ह्यांमध्ये जास्तीत जास्त समझोता करून प्रकरणे निकाली काढण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. जिल्हा परिषदेने महिलांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन पतपेढी, गुंतवणूक, कर्ज उपलब्ध करून महिलांच्या विकासासाठी प्राधान्य द्यावे. महिलांना जास्तीत जास्त शासनाच्या सोयी-सुविधा देऊन महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करावा. सोलापूर महापालिकेने नागरिकांना नियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा तसेच शहरामध्ये स्वच्छता राहील या अनुषंगाने प्रयत्न करावेत, अशाही सूचना त्यांनी दिल्या.