कास पठाराच्या परिसरात आज सकाळी अज्ञात व्यक्तीने औषधांच्या बाटल्या, गोळ्यांची पाकिटे व इतर जैविक कचरा आणून जाळल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले.

कासपठार कार्यकारी समितीचे सदस्य ज्ञानेश्वर आखाडे जात असताना त्यांनी हा प्रकार पाहिला. संबंधित औषधांच्या पाकिटावर कंपनी व गोळ्या यांची नावे असून, संबंधित विभागाने कचऱ्याची पाहणी करून नेमका कोणी हा प्रकार केला आहे, याचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.

uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
24 tree fall due to unseasonal rain in pimpri chinchwad
पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
Leopard in Vasai Fort area fear among citizens
वसई किल्ला परिसरात बिबट्याचा वावर… नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडून शोध सुरू

सातारा-कास रस्त्यावर पारांबे फाटा येथून एकीव गावाकडे येणारा रस्ता आहे. एकीव गावातील प्रसिद्ध पाबळ धबधब्यामुळे या परिसरात पर्यटकांचा वावर असतो. या रस्त्याच्या कडेला पारांबे गावच्या हद्दीत हा कचरा सकाळी लवकर आणून टाकला तसेच या कचऱ्याला आग लावण्यात आली. या परिसरात सातारहून येणाऱ्या व्यक्तींच्या निदर्शनास हा प्रकार आला. हा कचरा जाळल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा त्रास होत होता. शासकीय नियमाप्रमाणे अशा वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावणे अपेक्षित असताना असा कचरा कास परिसरातील निर्जन ठिकाणी आणून जाळण्याच्या या प्रकारामुळे परिसराचे आरोग्य व सौंदर्य धोक्यात येत आहे.