राहाता : महात्मा फुले जन आरोग्य योजना अधिक लोकाभिमुख करण्यासाठी योजनेच्या रकमेमध्ये, तसेच ही सेवा देणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली.

लोणी येथील प्रवरा अभिमत विद्यापीठाचा १९ वा पदवीदान समारंभ आज, शनिवारी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितित झाला. विद्यापीठाचे कुलपति डॉ. राजेंद्र विखे, कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे, विश्वस्त ध्रुव विखे, सुवर्णा विखे, मोनिका विखे आदी या वेळी उपस्थित होते.

अलीकडच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान येत असल्याने डॉक्टरांची जबाबदारी अधिक वाढली आहे. भविष्यात देशाला, राज्याला चांगले डॉक्टर आणि राजकारण्यांची गरज आहे. आरोग्य खात्यात नवीन क्रांती घडत असल्याने डॉक्टरांनी वैद्यकीय क्षेत्राकडे व्यवसाय म्हणून न पाहता ग्रामीण भागात रुग्णांची सेवा करावी, असा सल्ला आरोग्यमंत्र्यांनी दिला.

या पदवीदान सोहळ्याच्या माध्यमातून मेहनत आणि चिकाटीने मिळविलेल्या या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचा त्यांनी गौरव केला. महात्मा फुले जन आरोग्य योजना अधिक लोकाभिमुख करण्यासाठी योजनेच्या रकमेमध्ये, तसेच ही सेवा देणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या मानधनात वाढ केली जाईल असेही आबिटकर या वेळी म्हणाले.

मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, ‘वैद्यकीय क्षेत्रातील बदलांना सामोरे जाताना ग्रामीण भागात जाऊन सेवा देण्याचे आव्हान स्वीकारावे. लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून उभारलेले हे विद्यापीठ गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि ग्रामीण रुग्णालयातून दिल्या जाणाऱ्या मोफत उपचारांमुळे लोकाभिमुख ठरले आहे. येथील परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य धोरणाचा मसुदा तयार करत या विद्यापीठाने ग्रामीण आरोग्याचे एक ‘रोल मॉडेल’ दिले आहे.

लोणी येथील प्रवरा अभिमत विद्यापीठाचा १९ वा पदवीदान समारंभ आज, शनिवारी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितित झाला. विद्यापीठाचे कुलपति डॉ. राजेंद्र विखे, कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे, विश्वस्त ध्रुव विखे, सुवर्णा विखे, मोनिका विखे आदी या वेळी उपस्थित होते. कुलपति डॉ. राजेंद्र विखे यांनी अभिमत विद्यापीठाच्या उपक्रमाचा आढावा घेतला. प्रास्ताविकात कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे यांनी विद्यापीठाच्या वाटचालीची माहिती दिली. या वेळी यशस्वी विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला.