पंढरपूर : कार्तिकी यात्रेमध्ये लाखो भाविकांसाठी गेली १७ दिवस २४ तास उभे असलेल्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शिणवटा काढण्यात आला. कार्तिकी यात्रेनंतर प्रक्षाळपूजा करण्याची परंपरा आहे. विठूरायाला गरम पाणी व दह्यादूधानं स्नान घालण्यात आलं आणि आयुर्वेदिक काढाही देण्यात आला. यानंतर देवाचे नित्योपचार पूर्ववत सुरु करण्यात आले.

कार्तिकी यात्रेत लाखो भक्तांना दर्शन देण्यासाठी विठुराया अहोरात्र उभा होता. यात्रा सुरू झाल्यावर सलग १७ दिवस मंदिरात २४ तास दर्शन सुरू असते. या काळात विठ्ठलाला थकवा येऊ नये म्हणून पाठीला लोड लावण्यात आला होता. याकाळात देवाचे सर्व नित्योपचार बंद होते. ते आज पूर्ववत करण्यात आले. अखंड उभे राहून दमलेल्या देवाचा शिणवटा काढण्यासाठी कित्येक वर्षांपासून ही प्रक्षाळ पूजा परंपरा सुरू आहे. यासाठी आज दुपारपर्यंत दर्शनाला येणारे भाविक लिंबू आणि साखर देवाच्या पायाला चोळून दर्शन घेत होते. यामुळे थकलेल्या पायाच्या शिरा मोकळ्या होतात अशी भावना असते.

Krishna River, Datta Mandir, audumbar,
सांगली : कृष्णेचा औदुंबरच्या दत्तमंदिरात शिरकाव, वारणाकाठी सतर्कतेचा इषारा
Bhoomipujan, Mahaprasad Gruh,
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ६५ कोटी खर्चाच्या नव्या महाप्रसादगृहाचे भूमिपूजन; एक लाख भाविकांना महाप्रसादाचा लाभ
Akkalkot, guru purnima, devotees,
अक्कलकोटमध्ये गुरूपौर्णिमेसाठी लाखाहून जास्त भाविक दाखल
special pass, Tuljabhavani Devi, Darshan,
तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आता ५०० रुपयांचा ऑनलाईन स्पेशल पास, ऑफलाईनबरोबरच मोबाईल अ‍ॅपवरूनही काढता येणार पास
Devotees, Shegaon, ashadhi ekadashi,
VIDEO : ‘शेगावी आलो तुझ्या दर्शनाला…’, आषाढीनिमित्त संतनगरी फुलली
tree authority proposal for replantation of controversial trees on gangapur road
गंगापूर रोडवरील वादग्रस्त वृक्षांचे पुनर्रोपण? वृक्ष प्राधिकरणाचा प्रस्ताव
nashik banyan tree marathi news
वटवृक्षाविषयी वादाची आदित्य ठाकरेंकडून दखल, मारहाणीची वृक्षप्रेमींकडून तक्रार
Demand for stone idols of Vitthal Rukmini
आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीच्या दगडी मूर्तींना मागणी, पंढरपूरमधली बाजारपेठ सजली

हेही वाचा – “शिवसेना घटनेच्या आधारे निर्णय घ्यायचा असेल तर…”, सुनावणी संपल्यानंतर असीम सरोदेंनी दिली माहिती

यानंतर ब्रह्मवृंदाच्या रुद्र आवर्तनाच्या जयघोषात देवाला दही, मध, साखर आणि शेवटी दुधाचा अभिषेक शंखातून करण्यात आला. पंचामृत स्नान झाल्यावर देवाला गरम केशर पाण्याने स्नान घालण्यात आले. यामुळे देवाच्या थकलेल्या शरीराला उत्साह प्राप्त होत असल्याची भावना वारकरी संप्रदायात आहे. यानंतर देवाला सुंदर पोशाख परिधान करण्यात आला. तसेच हिरे-माणिकांच्या दागिन्यांनी सजविण्यात आले. मस्तकी सुवर्ण मुकुट, गळ्यात अनमोल कौस्तुभ मणी, भाळी निळ्या हिऱ्यांचा नाम, दंडाला दंड पेट्या आणि गळ्यात अत्यंत मौल्यवान मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, तीन पदरी सुवर्ण तुळस माळ, मारवाडी पेठ्यांचे हार, मोठा लफ्फा आणि मोत्याचे कंठे घालण्यात आले. कानाला हिरेजडीत मस्य जोड अशा पोशाखात नटलेल्या विठुरायाचे सौंदर्य अतिशय खुलून दिसत होते.

हेही वाचा – “मला अजित पवार अन् प्रफुल्ल पटेलांनी मंत्रीपदाची ऑफर दिली होती, पण…”, अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण

रुक्मिणी मातेलाही वाक्या, तोडे, तानवड, मोहरा आणि पुतळ्यांच्या माळा, हायकोल, चिंचपेटी व पुतळ्याची माळ असे पारंपारिक दागिन्यांनी सजविण्यात आले होते. देवाचा शिणवटा घालवण्यासाठी रात्री गवती चहासह विविध प्रकारचे १५ ते १६ आयुर्वेदिक पदार्थांचा काढा झोपण्यापूर्वी दिला जातो. या काढ्यामुळे देवाला पूर्ण विश्रांती मिळून चांगली झोप लागते असे मानतात. दरम्यान या पूजेनंतर देवाचे नित्योपचार पुन्हा सुरु झाले आहेत. असे असले तरी प्रक्षाळ पूजेआधी आणि नंतर सगळे विधी पार पडत असताना देवाच्या चेहऱ्यावरील भाव बदलत जातात आणि आलेला शिणवटा जाऊन पुन्हा चेहरा प्रसन्न दिसू लागतो, अशी भावना वारकऱ्यांची आहे.