महाविकास आघाडीचे नेते रात्री-बेरात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात, असा गौप्यस्फोट शिंदे गटातील बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. सुप्रिया सुळे-अब्दुल सत्तार वादावरून आधीच महाविकास आघाडी आणि भाजपा-शिंदे गट आमने-सामने आले असताना आता प्रतापराव जाधव यांच्या या दाव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – आजारी असल्याने २० दिवसांच्या मुलीची आईने गळा दाबून केली हत्या, महाराष्ट्रातील घटनेने खळबळ

काय म्हणाले प्रतापराव जाधव?

खासदार प्रतापराव जाधव यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसंदर्भात एक धक्कादायक दावा केला आहे. “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदारच नाही, तर अनेक खासदारही अस्वस्थ आहेत. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रात्री-बेरात्री भेटत असतात. तसेच आमच्या अनेक मंत्र्यांचीही सह्यांद्रीवर जाऊन भेटत घेतात. हे मी स्वत: अनुभवलं आहे”, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.

हेही वाचा – राज ठाकरेंना आव्हान देणारे ब्रिजभूषण सिंह यांचा पुणे दौरा आणि मनसेची अडचण

प्रतापराव जाधवांकडून यापूर्वीही गंभीर आरोप

दरम्यान, यापूर्वीही खासदार प्रतापराव जाधव यांनी गंभीर आरोप करत सचिन वाझे यांच्याकडून मातोश्रीवर दर महिन्याला १०० खोके जात होते, असा गौप्यस्फोट केला होता. “अनिल देशमुख आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे हे आता जेलमध्ये आहेत. हे लोक महिन्याला वसुली करत होते. सचिन वाझे हे दर महिन्याला १०० खोके मातोश्रीवर पाठवत होते”, असे ते म्हणाले होते.