येथील नवनिर्माण महाविद्यालयातील प्रियदर्शनी जागुष्टे हिने मुंबई विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या पॉवर लिफ्टिंग आणि वेटलिफ्टिंग स्पध्रेमध्ये चमकदार कामगिरी करत ‘स्ट्रॉँग वुमन ऑफ मुंबई युनिव्हर्सिटी’ हा किताब पटकावला.     महाड येथील आंबेडकर महाविद्यालयामध्ये झालेल्या स्पध्रेत जागुष्टे हिने ८४ किलो वजन गटात बेंचप्रेसमध्ये ११५ किलो, डेडलिफ्टमध्ये २०० किलो आणि स्कॉटमध्ये १९० किलो असे एकूण ५०५ किलो वजन उचलून नवा उच्चांक प्रस्थापित केला. नवनिर्माण महाविद्यालयाच्याच प्रतीक गुरव यानेही पुरुष पॉवर लिफ्टिंग स्पध्रेत स्कॉट आणि डेडलिफ्ट प्रकारात मिळून ५९२.५ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले.      या विक्रमी कामगिरीमुळे या दोन्ही विद्यार्थ्यांची पुढील महिन्यात उदेपूर (राजस्थान) येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पध्रेसाठी मुंबई विद्यापीठाच्या संघामध्ये निवड झाली आहे. अशा प्रकारे रत्नागिरी जिल्ह्य़ातून प्रथमच मुंबई विद्यापीठाच्या संघात खेळाडूंची निवड झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyadarshani jagushte became strong woman of mumbai university
First published on: 17-01-2013 at 05:15 IST