हर्षद कशाळकर

अलिबाग : मुंबईतील कुर्ला येथे काल इमारत कोसळून १९ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रायगड जिल्ह्यात ६३९ इमारती धोकादायक असल्याची बाब आता समोर आली आहे. यातील ९६ इमारती या अतिधोकादायक आहेत. या इमारतीमधील रहिवाशांना प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे निर्देश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.

Pune pubs
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
Why strengthening of Ambazari lake in Nagpur
नागपूरच्या अंबाझरी तलाव बळकटीकरणाची गरज का? यंदाही पावसाळ्यात ‘ओव्हरफ्लो’ होणार का?
part of commercial building obstructing widening of the road was demolished mumbai municipal corporation
रस्ता रुंदीकरणाआड आलेल्या व्यावसायिक इमारतीचा काही भाग तोडला, पश्चिम उपनगरात प्रथमच केला पालिकेने प्रयोग
Livestock fodder shortage crisis in Akola district
पशुधनावर चारा टंचाईचे संकट, पशुपालक चिंतेत; चाऱ्याची जिल्ह्याबाहेरील वाहतुकीवर बंदी

मुंबईतील कुर्ला येथे तीन मजली इमारत काल कोसळली. या दुर्घटनेत १९ जणांचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यातही महाड येथे दोन वर्षांपुर्वी अशीच दुर्घटना घडली होती. या दुर्घटनांची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींना धोकादायक इमारती आणि धरणांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर एक महानगरपालिका, ९ नगरपालिका आणि सहा नगरपंचायतींनी आपले अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केले. या शहरांमध्ये प्राथमिक पाहाणीत ६३९ इमारती धोकादायक असल्याचे दिसून आले आहे. यात ९६ इमारती या अतिधोकादायक असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पनवेल येथे सर्वाधिक ३६८ धोकादायक, तर २८ अतिधोकादायक इमारती असल्याची बाब समोर आली आहे. कर्जत येथे ७ धोकादायक, १ अतिधोकादायक इमारती आहेत. उरणमध्ये ६३ धोकादायक, तर १२ अतिधोकादायक इमारती आहेत. महाड येथे ४२ धोकादायक, तर १४ अतिधोकादायक इमारती आहेत. श्रीवर्धन १२ धोकायदायक इमारती आहेत. अलिबागमध्ये १४ धोकादायक आणि २६ अतिधोकादायक इमारती आहेत. रोहा १० धोकादायक इमारती आहेत. तर पेणमध्ये २३ धोकादायक आणि १० अतिधोकादायक इमारती असल्याची बाब समोर आली आहे. याशिवाय मुरुड येथे १९, माथेरान ६, खालापूर ४, पाली ५ इमारती धोकादायक आहे. पोलादपूर येथे ३९ धोकादायक तर १ अतिधोकादायक, म्हसळा येथे ८ धोकादायक तर ३ अतिधोकादायक इमारतींचा समावेश आहे.

या सर्व इमारतींमधील रहिवाशांना महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत अधिनियम १९६५ च्या कलम १९५ अन्वये नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यानुसार प्रकल्पग्रस्तांचे मूलभूत प्रश्न कायम.