महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पूजा करण्याचा मान केवळ ब्राह्मण समाजातील पुजाऱ्यास होता. मात्र उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार मंदिरातील बडवे, उत्पात, सेवाधारी यांचे अधिकार संपुष्टात आले. त्यामुळे मंदिर समितीने सर्व जाती-जमाती आणि महिला पुजाऱ्यांची नियुक्ती केली असून, शुक्रवारी या नवनियुक्त पुजाऱ्यांकडून मंदिरातील पूजेस सुरुवात झाली. पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासात या घटनेमुळे एका नव्या पर्वास सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.बडवे, उत्पात, सेवाधारी यांचे अधिकार संपुष्टात आल्यानंतर विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजेसाठी मंदिर समितीमार्फत सर्व जातीतील इच्छुकांचे अर्ज मागवण्यात आले होते. यातून ब्राह्मणांसह अन्य जातींतील दहा पुजाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. यामध्ये दोन महिला पुजाऱ्यांचाही समावेश आहे. शुक्रवारी पहाटे ४ वाजता या पुजाऱ्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रत्यक्ष पूजेस सुरुवात झाली.
या वेळी मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांच्यासह कार्यकारी अधिकारी संजय तेली, व्यवस्थापक एस. एस. विभुते तर पोशाख प्रमुख हणुमंत ताठे, अतुल बक्षी, समिती सदस्य वसंत पाटील, प्रा.जयंत भंडारे आदी उपस्थित होते.
नियुक्तीविरोधात याचिका
वारकरी संप्रदायाचे अभ्यासक व सामाजिक कार्यकत्रे वाल्मीकी चांदणे यांनी ३० जुल रोजी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. यात समितीने दहा पुजाऱ्यांची केलेली नियुक्ती बेकायदा असल्याचे नमूद करून ही समिती अस्थायी असल्याचे म्हटले आहे. ही याचिका न्यायालयाने दाखल करून घेतली.
नवनियुक्त पुजारी
अमोल चंद्रकांत वाडेकर, केदार कृष्णदास नामदास, महेश रामचंद्र पुजारी, यशवंत रामचंद्र गुरव, राचय्या विश्वनाथ हिरेमठ, रवींद्र अंकुश स्वामी, ऊर्मिला अविनाश भाटे, हेमा नंदकुमार अष्टेकर, सुनील पोपट गुरव, संदीप धन्यकुमार कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Progressive turn of pandharpur vitthal temple
First published on: 02-08-2014 at 01:53 IST