सातारा जिल्ह्याच्या सीमेवर बैलगाडी शर्यतीचे आयोजन; १३ जणांवर गुन्हा दाखल

शिरवळ पोलिसांकडून दोन वाहनांसह तब्बल नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

Satara Bullock cart race
(संग्रहीत छायाचित्र)बैलांना चाबूक व काठीच्या सहाय्याने क्रुरपणे मारहाण करीत पळविल्या प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

पळशी( ता.खंडाळा) येथील दत्तनगर भागातील डोंगराच्या लगत असणाऱ्या मोकळ्या जागेत बेकायदेशीररित्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी आयोजकांसह १३ बैलगाडा चालकांविरुध्द शिरवळ पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरवळ पोलिसांनी दोन वाहनांसह तब्बल नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पळशी (ता.खंडाळा) याठिकाणी असणाऱ्या दत्तनगर परिसरात मोकळ्या जागेमध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिरवळ पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांना मिळाली. त्यानुसार शिरवळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश वळवी, राजू अहिरराव, पोलीस हवालदार विनोद पवार, दत्ताञय धायगुडे, म हिला पोलीस कर्मचारी लता पाडवी यांनी घटनास्थळी छापा टाकला असता त्याठिकाणी आशिष मोहिते, आकाश गावडे, करण भरगुडे, ओंकार भरगुडे, प्रविण भरगुडे, शुभम भरगुडे,जनार्दन कोळपे, पिनू भरगुडे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या बैलगाडा शर्यतीबाबतच्या आदेशाचा भंग करत बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याचे निदर्शनास आले.

या बैलगाडी शर्यतीमध्ये धायरेश्वर बाळासो पाटील (वय २८), आकाश किसन गावडे(वय २८), विशाल आनंदा बाटे (वय २७), वसंत विठ्ठल बाटे (वय २८), संकेत उत्तम बाटे (वय २१,सर्व रा.केंजळ ता.भोर जि.पुणे) यांनी स्वत:च्या मालकीच्या बैलांना चाबूक व काठीच्या सहाय्याने क्रुरपणे मारहाण करत, निर्दयपणे वागणूक देऊन पळविल्या प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

याप्रकरणी आशिष मोहिते, आकाश गावडे, करण भरगुडे, ओंकार भरगुडे, प्रविण भरगुडे, शुभम भरगुडे, जनार्दन कोळपे, पिनू भरगुडे या आयोजकांसह धायरेश्वर पाटील, आकाश गावडे, विशाल बाटे, वसंत बाटे, संकेत बाटे यांच्याविरुध्द शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार विनोद पवार यांनी दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार संतोष मठपती हे करीत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pune illegal bullock cart race organized on the border of satara district crimes registered against 13 persons msr