जगातल्या २०५ शहरांमध्ये मेट्रो आहे, भारतातही अनेक शहरांमध्ये मेट्रो आहे, तसेच अनेक शहरांमध्ये मेट्रोचे काम पूर्णत्त्वासही आले आहे. पुण्याची भौगोलिक परिस्थिती आणि सध्याचे मेट्रोचे काम पाहता, येत्या काळात पुणे मेट्रो मॉडेल हे देशभरातील मेट्रोसाठी येत्या काळात राबवले जाऊ शकते असेही दीक्षित यांनी स्पष्ट केले आहे.
पुणे मेट्रोकडे देशातल्या अनेक राज्यांचे लक्ष लागले आहे, शहरातील वाहतूक कोंडीबाबत अनेकवेळा चर्चा होते, मात्र मेट्रोचे काम पूर्ण झाल्यावर पुणेकरांना चांगला प्रवास करता येईल आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल असा विश्वासही दीक्षित यांनी व्यक्त केला. पुणे मेट्रोच्या कामाला गती मिळाली असून २०२१ पर्यंत हे काम पूर्ण होईल, असेही दीक्षित यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी ८४५ कोटी युरो खर्च येणार आहे. या ८४५ कोटी युरोंपेकी, ६०० मिलियन युरो युरोपियन इनव्हेस्टमेंट बँक देणार आहे, तर उर्वरित २४५ मिलियन युरोसाठी अर्थ मंत्रालय आणि फ्रान्स डेव्हलपमेंट बँकेशी चर्चा करण्यात आली आहे अशीही माहिती यावेळी दीक्षित यांनी दिली आहे.