राहुल गांधींचं स्वागत करण्यासाठी मी नाशिकमध्ये आलो आहे. राहुल गांधी यांचं स्वागत आम्ही करु. त्यांच्या यात्रेतही शिवसैनिक सहभागी होतील. आम्ही इथे यजमान आहोत त्यामुळे आम्ही राहुल गांधींच्या स्वागताची तयारी सुरु केली आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच १७ तारखेच्या राहुल गांधींच्या सभेत उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

जेव्हा संविधान संकटात असतं तेव्हा सगळ्या पक्षांनी एकत्र आलंच पाहिजे

जेव्हा देश संकटात असतो, संविधान संकटात असते, लोकशाही संकटात असते तेव्हा सगळे मतभेद विसरुन एकत्र यायचं असतं. नाशिक ही वीर सावरकर यांची भूमी आहे. नाशिकमध्ये शालिमार चौकात आमचं कार्यालय आहे. राहुल गांधींचं स्वागत केलं जाईल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. जे आमच्यावर टीका करतात त्या भाजपाच्या लोकांना आम्ही विचारु इच्छितो की १९७८ मध्ये आपण सगळे का एकत्र आला होतात? कारण तेव्हाही देश संकटात आहे अशीच स्थिती निर्माण झाली होती. आताही तशीच परिस्थिती आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी वीर सावरकरांच्या भूमित येत आहेत

वीर सावकर यांच्या भूमित राहुल गांधी येत आहेत, त्यांचं स्वागत होतं आहे. खरं म्हणजे मनसेने मुंबईवर जे संकट येतं आहे गुजरात लॉबीकडून त्यांना बघून घेण्याची भाषा केली पाहिजे. मुंबई गिळली जाते आहे, मराठी माणसावर रोज अन्याय होतो आहे. शिवसेना म्हणून आम्ही लढतो आहोत. तो विषय गंभीर आहेत. वीर सावरकर आमचा पंचप्राण आहेत. राहुल गांधी काय बोलतील याची चिंता करण्यापेक्षा मुंबई महापालिकेचे टेंडर गुजराती भाषेत का निघाले? त्याची चिंता केली पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे आणि राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

हे पण वाचा- Sanjay Raut:“वसंत मोरेंनी वॉशिंग मशीनच्या दिशेने…”, वसंत मोरेंची मनसेला सोडचिठ्ठी अन् राऊतांचं विधान

नितीन गडकरींबाबत आम्ही प्रामाणिक भावना बोलून दाखवल्या

नितीन गडकरी हे दिल्लीतले महत्त्वाचे नेते आहे. आम्ही त्याबद्दल भावना व्यक्त केल्या. त्यात बालिश म्हणण्यासारखं काय? ते अन्याय सहन करत आहेत त्यामुळे ते बोललो होतो. वीर सावरकर हा विषय आमच्यासाठी आणि काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत. त्या विषयावर राहुल गांधींनी आपलं मत मागच्या वेळी जे बोलले होते त्यानंतर काहीही बोलले नाहीत असंही संजय राऊत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाने ४०० पारचा नारा दिला आहे, तो नारा २०० पारपर्यंतच थांबेल अशी चर्चा आहे.अशोक चव्हाण यांना नांदेडच्या एका जागेसाठी राज्यसभा निवडणूक दिली आहे. त्यांच्या मनात भीती आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचा खासदार मोठ्या फरकाने जिंकेल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.