महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची आज २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. दोन वर्षांनी मनसेचा पाडवा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे राज ठाकरे दोन वर्षांनंतर भाषण करत असल्याने सर्वांनाच उत्सुकता होती. आजच्या या सभेत राज ठाकरे यांनी प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. भाजपासोबत शिवसेनेनं युती तोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत एकत्र येत सरकार स्थापन केल्यावरून राज ठाकरेंनी शिवसेनेला खडे बोल सुनावले. याशिवाय बऱ्याच मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला लक्ष्य केलं.
“मदरशांवर…”; राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी
राज ठाकरे सभेत बोलताना म्हणाले की, “कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा,” असं राज ठाकरे म्हणाले.
Gudi Padwa Melava 2022: “…तर तुम्हाला पाकिस्तानची गरज भासणार नाही”; राज ठाकरेंचं वक्तव्य
“अनेक देशांमध्ये मशिदी आहेत, तिथेही प्रार्थना केल्या जातात, पण जाहीरपणे भोंगे बसवल्याचं तुम्ही कधी पाहिलंय का, कोणत्या धर्मात भल्या पहाटे उठून भोंगे वाजवण्यास सांगितलं गेलंय. यापुढे आम्ही मशिदीवरील भोंगे खपवून घेणार नाही. ज्या मशिदीबाहेर भोंगा दिसेल, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार,” असा इशारा राज ठाकरेंनी दिला.