scorecardresearch

Premium

सांगली: जीवावर बेतलेलं कपड्यावर निभावलं, शाळकरी मुलावर रानगव्याचा हल्ला

गर्दीमुळे बिथरलेल्या गव्याने आदित्य प्रशांत पाटील या मुलावर हल्ला केला.

rangava
जमलेल्या लोकांनी आरडाओरडा केल्याने गव्याने शेतात धूम ठोकली. (फोटो सौजन्य- प्रातिनिधक छायाचित्र)

सांगली: जिवावर बेतलेलं, कपड्यावर निभावलं अशी स्थिती शाळकरी मुलगा आदित्य पाटील याची शनिवारी पुनवत (ता. शिराळा) येथे गव्याने केलेल्या हल्ल्यावेळी घडली. लोकांच्या गोंगाटाने गव्याने पळ काढला असला तरी नागरिकांनी सावध राहावे अशा सूचना वन विभागाने ग्रामपंचायतीच्या ध्वनी वर्धकावरून नागरिकांना दिल्या.

शनिवारी सकाळी पुनवत येथील तराळकी शिवारात गव्याचे दर्शन नागरिकांना झाले. ही माहिती मिळताच अनेक बघ्यांची गर्दी या ठिकाणी झाली. या गर्दीमुळे बिथरलेल्या गव्याने आदित्य प्रशांत पाटील या मुलावर हल्ला केला. मात्र, गव्याचे शिंग मुलाच्या कपड्यातच अडकले. तरीही गव्याने दिलेल्या हिसड्यामुळे मुलगा दूर जाउन पडला. सुदैवाने त्याला कोणतीही इजा झाली नाही. मात्र, याच वेळी जमलेल्या लोकांनी आरडाओरडा केल्याने गव्याने शेतात धूम ठोकली.

pune crime news, youth killed by his relatives dhayari
पुणे : धायरीत जमिनीच्या वादातून नातेवाईकांकडून तरुणाचा खून, मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार
man committed suicide mumbai
मुंबई : मित्राची हत्या करून आरोपीचीही आत्महत्या
boyfriend suicide nagpur
प्रेयसीवर जीवापाड प्रेम, साता जन्माच्या आणाभाका; पण अर्ध्यावरती डाव मोडला अन् प्रियकराने…
farmer injured in leopard attack in buldhana
बुलढाणा: बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी जखमी; आरडाओरड केल्याने वाचले प्राण

आणखी वाचा- बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे गटाबरोबर जाण्यावरून कोल्हापुरातील ठाकरे गटातील मतभेद उफाळले

हा प्रकार पोलीस पाटील बाबासाहेब वरेकर यांनी वन विभागाला तात्काळ कळविला. वन रक्षक प्रकाश पाटील व अन्य कर्मचार्‍यांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेत नागरिकांना दक्ष  राहण्याच्या सूचना दिल्या. दिवसा शेतात काम करीत असताना दक्षता बाळगण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या ध्वनीवर्धकावरून देण्यात आले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ranagava attack on school boy in sangali mrj

First published on: 22-04-2023 at 18:58 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×