scorecardresearch

राज्यात ७२०० पोलिसांची भरती-गृहमंत्री

राज्यातील पोलीस ठाण्यांच्या अत्याधुनिकीकरणासाठी राज्य सरकारकडे निधी मागितला जाणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे यांनी दिली.

नगर: राज्यात पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेली आलेली ५७०० पोलिसांची भरतीची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. आता दुसऱ्या टप्प्यात ७२०० पोलिसांची भरतीची प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू केली जाणार आहे. याबरोबरच राज्यातील पोलीस ठाण्यांच्या अत्याधुनिकीकरणासाठी राज्य सरकारकडे निधी मागितला जाणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे यांनी दिली.

गृहमंत्री वळसे यांनी शुक्रवारी सायंकाळी जिल्हा पोलीस दलाची आढावा बैठक घेतली. तत्पूर्वी यांच्या हस्ते ‘ई-टपाल’ सेवासुविधेचे तसेच स्वागत कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. आमदार संग्राम जगताप, नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह पोलीस अधिकारी व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीनंतर गृहमंत्री वळसे यांनी पत्रकारांवरील माहिती दिली.

राज्यात मार्चनंतर मोठ्या प्रमाणावर पोलिसांसाठी घरे उभारणीचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. पोलीस ठाण्यांच्या अत्याधुनिकीकरणासंदर्भात आपल्याकडे माहिती संकलित झाली आहे. त्यानुसार राज्य सरकारकडे निधी मागितला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Recruitment of 7200 police in the state information home minister dilip walse akp

ताज्या बातम्या