जिल्ह्यातील साखर कारखाने कोणत्या स्थितीत आहेत, उद्योगधंदे कोणत्या पद्धतीने चालत आहेत, याचा विचार करावा लागणार आहे. सध्या आपणाकडे भाजप प्रदेश उपाध्यक्षपदाची सूत्रे असून सोलापूरची शिवसेना तेथील भाजप उमेदवाराचे काम करणार नसल्याचा पवित्रा घेत आहे. त्यामुळे येत्या २९ मार्चपर्यंत चिरंजीव रोहनला उमेदवारी मिळावी, म्हणून प्रयत्न करणार आहोत. तसे न झाल्यास पक्षाच्या पदाचा राजीनामा देणार आहे. उस्मानाबाद मतदारसंघातून लोकमंगल प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष रोहन देशमुख हे जनतेचे उमेदवार म्हणून िरगणात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत सोलापूरचे माजी खासदार तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुभाष देशमुख यांनी भूम येथे पत्रकारांशी बोलताना दिले.
देशमुख यांनी रोहन यांच्या उमेदवारीमागे राष्ट्रवादीचा हात असल्याच्या चच्रेचा चांगलाच समाचार घेतला. आपली बाजू स्पष्ट करताना ते म्हणाले की, मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा घाम गाळला होता. २००४ मध्ये सोलापूर येथून माजी मुख्यमंत्र्यांची दमछाक केली. इतके असताना रोहनला राष्ट्रवादीची मदत का घ्यावी लागणार? असा प्रतिसवालही त्यांनी उपस्थित केला.
चार वर्षांपासून रोहनने उस्मानाबाद जिल्ह्यात बँक, तसेच इतर सामाजिक उपक्रमांतून जनसंपर्क वाढविला आहे. कोरी पाटी असलेला उमेदवार म्हणून जनता रोहनकडे पाहत आहे. २५ वर्षांपूर्वी लातूर वेगळे झाले. विकासामुळे ते शहर नावारूपास आले. त्या तुलनेत आपण आहो तेथेच आहोत. त्यामुळे जिल्ह्याचा विकास साधण्यासाठीच जनतेचे उमेदवार म्हणून रोहनची उमेदवारी असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. रोहनचे काम करणाऱ्या कोणासही मी वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. अॅड. रोहित जोशी, सोलापूरचे नगरसेवक नरेंद्र काळे, धनंजय पाटील, अंगद मुरूमकर आदींसह कार्यकत्रे बहुसंख्येने उपस्थित होते.