सेवानिवृत्तीनंतर मिळालेली पाच लाख रूपयांची मिळकत चोरटय़ांनी लांबविल्याने मजुरास डोक्यावर हात मारून बसण्याची वेळ आली आहे. शहापूरमधील अत्यंत गजबजलेल्या पंडित नाक्यावर मोटार सायकलच्या डिकीमध्ये ठेवलेली पाच लाखांची रोकड चोरटय़ांनी हातोहात लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडली. शहापूरमधील भातसा कालवा उप विभाग क्रमांक दोनमध्ये मजूर म्हणून कार्यरत असलेले बबन भाऊ शिरोसे हे गेल्या वर्षी मे महिन्याच्या अखेरीस निवृत्त झाले. निवृत्ती पश्चात मिळालेली पाच लाखांची रक्कम स्टेट बँकेत जमा झाली होती. ती रक्कम काढून ते मुलासह तालुक्यातील कुकांबे येथील आपल्या घरी जात असताना वाटेत पंडित नाक्यावर भाजी घेण्यासाठी थांबले. तेवढय़ात चोरटय़ाने रोकड लांबवली. यासंदर्भात त्यांचा मुलगा गुरनाथने शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Oct 2013 रोजी प्रकाशित
शहापूरमध्ये पाच लाखांची लूट
सेवानिवृत्तीनंतर मिळालेली पाच लाख रूपयांची मिळकत चोरटय़ांनी लांबविल्याने मजुरास डोक्यावर हात मारून बसण्याची वेळ आली आहे.
First published on: 12-10-2013 at 12:02 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery of 5 lakh in shahapur of thane district