Prada Criticized over Didn Gave Credit for Kolhapuri Chappals : कोल्हापुरी चपला जगभरात प्रसिद्ध आहेत. नऊवारी साडी असो, पारंपारीक कपडे, कुर्ता अथवा जीन्स, कोणत्याही कपड्यांवर ही चप्पल चांगलीच दिसते. अनेक जण आपापल्या कपड्यांवर शोभतील अशा रुबाबदार कोल्हापुरी चपला परिधान करून फिरताना दिसतात. मात्र, सध्या कोल्हापुरी चप्पल हा जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. एका आंतरराष्ट्रीय कंपनीने कोल्हापुरी चपलेची नक्कल स्वतःच्या नावने चप्पल सादर केल्याचा आरोप होत आहे. नक्कल करून तयार केलीली चप्पल महागड्या किमतीत एका फॅशन शोमध्ये सादर केली. हे करत असताना त्यांनी कोल्हापूरमधील कारागिरांना त्याचं श्रेय दिलं नाही. त्यामुळे या कंपनीला नेटकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.

इटलीत पार पडलेल्या एका फॅशन शोमध्ये प्राडा (Prada) नावाच्या एका कंपनीने सादर केलेली चप्पल पाहून या कंपनीवर कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड चोरी केल्याचा, कोल्हापुरी चप्पलची नक्कल करून स्वतःच्या नावाने खपवल्याचा आरोप होत आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे या चपलेची किंमत. भारतात ५०० ते १५०० रुपयांमध्ये विकल्या जाणाऱ्या कोल्हापुरी चपलेची नक्कल केलेल्या प्राडाच्या चपलेची किंमत मात्र एक लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या कंपनीवर टीका देखील होत आहे.

रोहित पवारांकडून प्राडावर कारवाई करण्याची मागणी

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी प्राडा कंपनीला चप्पलचोर म्हटलं आहे. आमदार पवार यांनी याबाबत एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे प्राडा कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “प्राडा कंपनीने महाराष्ट्राच्या कोल्हापुरी चप्पलची कॉपी करत नवी सॅन्डल बाजारात आणली असून ती एक लाखाला विकत आहेत. कॉपी केली त्याची तक्रार नाही परंतु, जीआय टॅग (GI Tag) असलेल्या कोल्हापुरी चप्पलची कॉपी करून विकताना किमान कोल्हापूरच्या कारागिरांना त्याचं श्रेय तरी देण्याचं सौजन्य आणि ब्रॅन्डिंग करताना कोल्हापुरी चप्पल म्हणूनच ब्रॅन्डिंग करण्याचं भान जर या कंपनीला नसेल तर अशा चप्पलचोर कंपनीवर महाराष्ट्र शासनाने कायदेशीर कारवाई करायला हवी!