प्रशांत देशमुख

वर्धा : शिवसेनेचे देवळी विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार आणि सर्वात मोठ्या यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर सुरेशराव देशमुख यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज होणारा प्रवेश तूर्त लांबणीवर पडला आहे. समीर देशमुख यांच्या ‘घरवापसी’साठी आजचा मुहूर्त ठरला होता. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता मुंबईच्या पक्ष कार्यालयात ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते. मात्र, उद्याची राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषदेचे अर्ज दाखल करण्याची गडबड, यामुळे त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश लांबला आहे. तथापि, ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार, हे निश्चित असल्याचे त्यांचे निकटवर्तीय, ज्येष्ठ सहकार नेते अॅड. सुधीर कोठारी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.

raver lok sabha marathi news, ravel lok sabha ncp candidate marathi news
भाजपमधून प्रवेश केलेल्या श्रीराम पवार यांना रावेरमध्ये राष्ट्रवादीची उमेदवारी
Yashwant Sena, Sanjay Kshirsagar
मोहोळमध्ये बलाढ्य राष्ट्रवादीशी झुंज देणारे संजय क्षीरसागर भाजपकडून बेदखल, यशवंत सेनेकडून उमेदवारी
maval lok sabha
अखेर मावळमधून शिवसेनेकडून खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर
gathering of wrestlers pune
मी काही स्वार्थासाठी बारामती, बारामती करायला आलो नाही : अजित पवार

२०१९ मध्ये ऐनवेळी शिवसेनेची तिकीट मिळविण्यात यशस्वी झालेल्या समीर देशमुख यांना देवळी विधानसभा मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हापासून ते राजकीय भविष्याची चाचपणी करीत होते. शिवसेनेने त्यांना विदर्भ युवा सेनेचे पद तसेच जिल्हाप्रमुख पदाची ऑफर दिली होती, पण ती  त्यांनी नाकारली.  त्यानंतर विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली. मात्र, त्यातही त्यांना यश आले नाही. यामुळे ते मोठा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये होती.

मध्यंतरी, खासदार सुप्रिया सुळे वर्धेत आल्या असताना समीर देशमुख त्यांच्यासोबत उपस्थित होते. पत्रकारांनी ही ‘घरवापसी’ आहे का, असा प्रश्न केल्यावर, हा आमचा घरगुती प्रश्न असल्याचे उत्तर देत सुळे यांनी अधिक भाष्य टाळले. समीर यांना शिवसेनेकडून महामंडळ किंवा तत्सम लाभाच्या पदाची अपेक्षा होती. मात्र, शिवसेना वरिष्ठांनी ते मनावर न घेतल्याने त्यांची सेनेतील उपस्थिती नाममात्रच उरली. अखेर पवार कुटुंबाशी कौटुंबिक स्नेह असलेल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे धुरीण म्हणून ओळखल्या जाणा-या वडील प्रा. सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परत काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. याबाबत त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही, मात्र पक्षाचे प्रदेश सरचिटणीस किशोर माथनकर यांनी, समीर देशमुख आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. त्यासाठी ते आणि इतर ज्येष्ठ नेते मुंबईत पोहोचले आहे. त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला की नाही, याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.